महत्त्वाची स्थळे : महाराष्ट्रातील अनेक स्थळांना वेगवेगळ्या कारणांनी महत्त्व प्राप्त झालेले आहे. सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान झालेली गिरिस्थाने,अक्षर शिल्पकलांनी नटलेल्या प्राचीन गुंफा, सु. ७२० किमी. लांबीच्या सागरी किनाऱ्यावरील पुळणी, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये,इतिहासप्रसिद्ध किल्ले,तीर्थक्षेत्रे व धार्मिक स्थाने, सहलीची ठिकाणे, उष्ण पाण्याचे झरे यांबरोबरच ज्यांना आधुनिक तीर्थक्षेत्रे म्हणून समजण्यात येते असे मोठमोठे प्रकल्प, उद्योगनगरे,वैज्ञानिक,शैक्षणिक-संशोधनपर संस्था यांनी महाराष्ट्र भूमी संपन्न आहे. अशा विविध प्रकारच्या पर्यटन केंद्रामुळे कोणत्याही आवडीच्या पर्यटकाला महाराष्ट्रात प्रवास करण्याचा आनंद लुटता येतो. महाराष्ट्रातील अशा महत्त्वाच्या बहुतेक स्थळांवर विश्व कोशात स्वतंत्र नोंदी आहेत. उदा., जिल्ह्यांची मुख्य ठिकाणे,राज्यातील महत्त्वाचे किल्ले,गिरिस्थाने, तीर्थक्षेत्रे,पुरातत्त्वीय उत्खनित स्थळे,अजिंठादी लेणी यांचाही त्यात समावेश होतो.

पुढील विवेचनात काही पर्यटन स्थळांची थोडक्यात माहिती दिली आहे :

मरीन ड्राइव्ह, मुंबई.
                                     

(अ) किल्ले व ऐतिहासिक स्थाने: भुईकोट किल्ले,डोंगरी किल्ले  अथवा  गड  आणि  जलदुर्ग  अशा  तीनही  प्रकारचे  किल्ले महाराष्ट्रात आढळतात. अहमदनगर, वसई (जिल्हा-ठाणे),सोलापूर हे काही  प्रसिद्ध  भुईकोट  किल्ले  आहेत.  गड  अधिकतर  पुणे,सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, रायगड  व अहमदनगर जिल्ह्यांत आढळतात. राजगड,पुरंदर,सिंहगड, तोरणा,शिवनेरी (पुणे) प्रतापगड,सज्जनगड,अजिं क्यतारा (सातारा) पन्हाळगड,विशाळगड (कोल्हापूर) रायगड (रायगड) नळदुर्ग (उस्मानाबाद) अंकाई-टंकाई (नासिक),दौलताबाद (औरंगाबाद),या सर्व गडांना मराठ्यांच्या इतिहासात खास स्थान आहे. गाविलगड (अमरावती) हा विदर्भातील महत्त्वाचा गड होय. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) व जंजिरा (रायगड) हे  तीन  महत्त्वाचे  जलदुर्ग होत. बाळापूर (अकोला) येथील किल्ला व मिर्झाराजे जयसिंग यांची छत्री,खुल्दाबाद (औरंगाबाद) येथील औरंगजेबाची कबर इ. उल्लेखनीय आहेत.

प्राचीन अप्रतिम शिल्प-चित्र सौंदर्यासाठी अजिंठा-वेरूळ (औरंगाबाद) कार्ले,भाजे,भेडसा (पुणे) पांडव लेणी (नासिक) घारापुरी (रायगड) इ. स्थळेही पर्यटकांचे कायमचे आकर्षण ठरलेली आहेत.


रायगडावरील नगारखाना

(आ) धार्मिक स्थळे : भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्व र (औरंगाबाद),परळी वैजनाथ (बीड),औंढा नागनाथ (परभणी),भीमाशंकर (पुणे) व त्र्यंबकेश्र्वर (नासिक) ही पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. महड,पाली (रायगड) लेण्याद्री,ओझर,थेऊर,रांजणगाव,मोरगाव (पुणे) व सिद्धटेक (अहमहनगर) या अष्ट-विनायकां इतकीच टिटवाळा(ठाणे),चिंचवड (पुणे),गणपति-पुळे आणि हेदवी (रत्नागिरी) ही गणपतिक्षेत्रे प्रसिद्ध आहेत.महाराष्ट्राचे प्रमुख दैवत असलेलेश्रीविठ्ठलाचे पंढरपूर (सोलापूर) हेभाविकांचे मोठे श्रद्धास्थान,तरऔदुंबर (सांगली),नरसोबाचीवाडी (कोल्हापूर) ही दत्तभक्तांचीश्रद्धास्थाने आहेत. आळंदी (संतज्ञानेश्वर) पैठण,देहू (संत तुकाराम),परळी-सज्जनगड (रामदास-स्वामी),आंबेजोगाई (मुकुंदराज, दासोपंत) ही गावे संतांच्या वास्तव्याने पवित्र झालेली क्षेत्रस्थाने,तरगजानन महाराजांचे शेगाव(बुलढाणा) व साईबाबांचे शिर्डी(अहमदनगर) ही क्षेत्रेही प्रसिद्ध आहेत. जेजुरी (पुणे/खंडोबा), माहूर (नांदेड/रेणुकामाता), रामटेक (नागपूर/श्रीराम),तुळजापूर

(उस्मानाबाद/तुळजाभवानी),कोल्हापूर (महालक्ष्मी),क्षेत्र परशुराम (रत्नागिरी) ही भाविकांच्या दृष्टीने काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. श्रीरामचंद्राच्या वास्त व्याने पुनीत झालेल्या नासिकला दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याला भारतातील इतर प्रांतांतूनही यात्रेकरू येतात. बाहुबली (कोल्हापूर) जैनांचे,तर नांदेड शिखांचे तीर्थक्षेत्र आहे. हाजीमलंग (ठाणे) येथे मुसलमान भाविकांबरोबर हिंदू भक्तांचीही गर्दी होते. माउंट मेरी (मुंबई) व फातिमा (रायगड) या ठिकाणी ख्रिस्ती धर्मीयांच्या वार्षिक यात्रा भरतात.

(इ) थंड हवेची स्थळे: महाबळेश्व र,पाचगणी (सातारा), पन्हाळा (कोल्हापूर),आंबोली (रत्नागिरी),माथेरान (रायगड),खंडाळा,लोणावळा (पुणे),चिखलदरा (अमरावती) ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे आहेत.

(ई) सहलीची काही ठिकाणे: अलिबाग (रायगड) येथील जलदुर्ग,पुळणी,रंधा धबधबा भंडारदरा धरण (अहमदनगर),भाटघर धरण (पुणे),बोर अभयारण्य (वर्धा), ढाकणे कोळखाज वन्यप्राणी अभयारण्य (अमरावती),कर्नाळा पक्षी अभयारण्य (रायगड), किनवट अभयारण्य (नांदेड),मालवण येथील पुळणी (सिंधुदुर्ग),नरनाळा अभयारण्य (अकोला),नागझिरा अभयारण्य,नवेगाव येथील राष्ट्रीय उद्यान (भंडारा),पाल व यावल अभयारण्य (जळगाव),राधानगरी अभयारण्य (कोल्हापूर),माळढोक पक्षी अभयारण्य (अहमदनगर,सोलापूर),ताडोबा राष्ट्रीय उद्यान (चंद्रपूर),सेवाग्राम येथील गांधीजींचा व पवनार येथील विनोबाजींचा आश्रम (वर्धा),तानसा तलाव व अभयारण्य (ठाणे), तोरणमाळ येथील वनश्री (धुळे),वज्रेश्वरी येथील उष्ण पाण्याचे झरे (ठाणे),कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर (नासिक),लोणार येथील नैसर्गिक सरोवर (बुलढाणा) यांसारखी अनेक स्थाने पर्यटकांकरिता आकर्षणे आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर,कोल्हापूर इ. शहरेही पर्यटनाच्या दृष्टीने विशेष आहेत.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यात २६ ठिकाणी पर्यटक निवास (हॉलिडे रिसॉर्टस) पुणे, शिर्डी येथे हॉटेले तर औरंगाबाद येथे युवकांसाठी वसतिगृह चालविले जाते. या महामंडळातर्फे मुंबई, पुणेयांसारख्या ठिकाणीस्थानिकसहली काढल्या जातात व राज्यातआणि राज्याबाहेरील सहलींचे-देखील मंडळ आयोजन करते.

मंडळाच्या वतीने मुंबई-औरंगाबाद, मुंबई-शिर्डी, मुंबई-पणजी या मार्गावर रोज बससेवा चालते. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद,  पणजी (गोवा) व नवी दिल्ली येथे महामंडळाची विभागीय कार्यालये असून त्यांच्यातर्फे पर्यटकांना नकाशे,  माहितीपत्रके, भेटवस्तू उपलब्ध केल्या जातात.   अनेक खाजगी यात्रा-कं पन्यादेखील महाराष्ट्रातील स्थळांकरिता

सहली व यात्रा काढतात.  महाराष्ट्रात पर्यटनाला अजूनहीभरपूर वाव आहे. दुर्गमता किंवाइतर काही कारणांमुळे काही ठिकाणेअजून प्रकाशात आलेली नाहीत. उदा., अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरनजीक  वडगाव-पाडळीच्या  परिसरातील लवणस्तंभ पर्यटकांकरिता आकर्षण ठरतील. मुंबई-पुणे-औरंगाबाद-मुंबईयांसारखी पर्यटकांकरिता तीन प्रवासमंडले (ट्रॅव्हल सर्किट्स) स्थापन करावयाची महाराष्ट्र शासनाने घोषणा केली आहे (ऑगस्ट १९८३). महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने रास्त दरात निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न शासनातर्फे चालू आहेत. (चित्रपत्रे १०, ११, १२, ३६, ३७, ३८,३९,४०,५८ व ५९).

पंडित,अविनाश


महाराष्ट्र राज्य (प्राकृतिक) (चित्रपत्र १०)
महाराष्ट्र राज्य (प्राकृतिक) (चित्रपत्र १०)

महाराष्ट्र राज्य (राजकीय) (चित्रपत्र ११)
महाराष्ट्र राज्य (राजकीय) (चित्रपत्र ११)

महाराष्ट्र राज्य (पर्यटन) (चित्रपत्र १२)
महाराष्ट्र राज्य (पर्यटन) (चित्रपत्र १२)

मुसलमानी राजवटीतील काळया रेशमी साडीवरील पैठणीसदृश जरीकाम, बऱ्हाणपूर.
मुसलमानी राजवटीतील काळया रेशमी साडीवरील पैठणीसदृश जरीकाम, बऱ्हाणपूर.
हिमरूकामाचा नमुना, औरंगाबाद, १८ वे शतक.
हिमरूकामाचा नमुना, औरंगाबाद, १८ वे शतक.
जोर्वे-नेवासे उत्खननात सापडलेली भांडी, ताम्रपाषाणयुग
जोर्वे-नेवासे उत्खननात सापडलेली भांडी, ताम्रपाषाणयुग
तंतुवाद्यनिर्मितीत गढलेले कारगीर, मिरज.
तंतुवाद्यनिर्मितीत गढलेले कारगीर, मिरज.
रंगविलेला सचित्र रांजण, दायमाबाद, ताम्रपाषाणयुग.
रंगविलेला सचित्र रांजण, दायमाबाद, ताम्रपाषाणयुग.
उत्खननात सापडलेल्या यक्षप्रतिमा :पितळखोरे (औरंगाबाद),मध्य अश्ययुग.
उत्खननात सापडलेल्या यक्षप्रतिमा :पितळखोरे (औरंगाबाद),मध्य अश्ययुग.
कलात्मक दीपमाळा :पारंपरिक कुंभारकाम,मुंबई.
कलात्मक दीपमाळा :पारंपरिक कुंभारकाम,मुंबई.

छत्रपती श्रीशिवाजी महाराज :राज्य शासनाने प्रकाशित केलेले चित्र.
छत्रपती श्रीशिवाजी महाराज :राज्य शासनाने प्रकाशित केलेले चित्र.
सेवाग्राम :महात्मा गांधींचा आश्रम, वर्धा.
सेवाग्राम :महात्मा गांधींचा आश्रम, वर्धा.
नवीन विधानभवन,मुंबई.
नवीन विधानभवन,मुंबई.
स्वातंत्रयवीर सावरकर स्मारक (नियोजित),शिवाजी पार्क, मुंबई.
स्वातंत्रयवीर सावरकर स्मारक (नियोजित),शिवाजी पार्क, मुंबई.
विधानभवन, नागपूर.
विधानभवन, नागपूर.
कोल्हापूरचे वस्तुसंग्रहालय
कोल्हापूरचे वस्तुसंग्रहालय
मंत्रालय,मुंबई.
मंत्रालय,मुंबई.

भवानी मातेची पाषाणमूर्ती, प्रतापगड, सु.१६ वे शतक.
भवानी मातेची पाषाणमूर्ती, प्रतापगड, सु.१६ वे शतक.
महिषासुरमर्दिनी दुर्गा,लेणे क्र.२१,वेरुळ,७ वे शतक.
महिषासुरमर्दिनी दुर्गा,लेणे क्र.२१,वेरुळ,७ वे शतक.
गंगाकोठी, पन्हाळा (कोल्हापूर).
गंगाकोठी, पन्हाळा (कोल्हापूर).
अजिंठा लेण्यांचा दर्शनी भाग, सु.५ वे -६ वे शतक.
अजिंठा लेण्यांचा दर्शनी भाग, सु.५ वे -६ वे शतक.
नवा राजवडा, कोल्हापूर.
नवा राजवडा, कोल्हापूर.
‘ न्यू इंडिया ॲशुरन्स कंपनी ’ च्या इमारतीवरील उत्थित शिल्प –ना.ग. पाणसरे,मुंबई.
‘ न्यू इंडिया ॲशुरन्स कंपनी ’ च्या इमारतीवरील उत्थित शिल्प –ना.ग. पाणसरे,मुंबई.
खंडोबाचे देऊळ,पाल (जि.सातारा),१८ वे शतक.
खंडोबाचे देऊळ,पाल (जि.सातारा),१८ वे शतक.
पहिल्या रघुजी भोसल्यांची समाधी,नवी शुक्रवारी, नागपूर.
पहिल्या रघुजी भोसल्यांची समाधी,नवी शुक्रवारी, नागपूर.

'किर्लोस्कर ब्रदर्स ’कारखान्यातील मशीन-टूल विभाग,किर्लोस्करवाडी.
‘किर्लोस्कर ब्रदर्स ’कारखान्यातील मशीन-टूल विभाग,किर्लोस्करवाडी.
पूर्णा प्रकल्प, मराठवाडा.
पूर्णा प्रकल्प, मराठवाडा.
इलेक्ट्रॉनिकी औद्योगिकसहकारी वसाहत,पुणे.
इलेक्ट्रॉनिकी औद्योगिकसहकारी वसाहत,पुणे.
घाटगे-पाटील कास्टिंग कारखान्याचे अंतर्दृश्य,उचगाव (जिल्हा कोल्हापूर).
घाटगे-पाटील कास्टिंग कारखान्याचे अंतर्दृश्य,उचगाव (जिल्हा कोल्हापूर).
पुण्याच्या टेल्को कारखान्यातील मालमोटारी तयार करणारा विभाग
पुण्याच्या टेल्को कारखान्यातील मालमोटारी तयार करणारा विभाग
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था,मसरुळ(जिल्हा नासिक).
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था,मसरुळ(जिल्हा नासिक).
लक्ष्मी विष्णु कापडगिरणीचे अंतर्दृश्य,सोलापूर.
लक्ष्मी विष्णु कापडगिरणीचे अंतर्दृश्य,सोलापूर.
वरळी दुग्धशाळेतील एक अंतर्दृश्य
वरळी दुग्धशाळेतील एक अंतर्दृश्य

गणेशोत्सव : विसर्जन-मिरवणूक,मुंबई.
गणेशोत्सव : विसर्जन-मिरवणूक,मुंबई.
वटसावित्री व्रतपूजा : रामाचा पार,महालक्ष्मी मंदिर-परिसर,कोल्हापूर.
वटसावित्री व्रतपूजा : रामाचा पार,महालक्ष्मी मंदिर-परिसर,कोल्हापूर.
पंढरपूरची वाटचाल करणारी वारकरी दिंडी
पंढरपूरची वाटचाल करणारी वारकरी दिंडी
महावरी जयंती मिरवणूक,एक दृश्य,कोल्हापूर.
महावरी जयंती मिरवणूक,एक दृश्य,कोल्हापूर.
पूणे येथील ताबूत मिरवणूकीचे दृश्य
पूणे येथील ताबूत मिरवणूकीचे दृश्य
बावधन(जि.सातारा) येथील बगाडाचे दृश्य
बावधन(जि.सातारा) येथील बगाडाचे दृश्य
नाताळचा सण : ख्रिस्तजन्म-देखावा.
नाताळचा सण : ख्रिस्तजन्म-देखावा.

नारायण सुर्वे ह्यांच्या 'जाहीरनामा' (१९७५) ह्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ, चित्रकार--सुभाष अवचट.
नारायण सुर्वे ह्यांच्या ‘जाहीरनामा’ (१९७५) ह्या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ, चित्रकार–सुभाष अवचट.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्या 'लेखसंग्रहा' चे (१९८२) मुखपृष्ट,चित्रकार--सुभाष अवचट.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्या ‘लेखसंग्रहा’ चे (१९८२) मुखपृष्ट,चित्रकार–सुभाष अवचट.
पु.ल. देशपांडे ह्यांच्या 'हसवणूक' (१९६८ ह्या विनोदी) लेखसंग्रहाचे मुखपृष्ठ, चित्रकार--वसंत सरवटे.
पु.ल. देशपांडे ह्यांच्या ‘हसवणूक’ (१९६८ ह्या विनोदी) लेखसंग्रहाचे मुखपृष्ठ, चित्रकार–वसंत सरवटे.
लोकमान्य टिळकांचे हस्ताक्षर
लोकमान्य टिळकांचे हस्ताक्षर
पैसाचा खांब,नेवासे.
पैसाचा खांब,नेवासे.
'महाराष्ट्र सारस्वत' कार वि.ल.भावे ह्यांचे हस्ताक्षर.
‘महाराष्ट्र सारस्वत’ कार वि.ल.भावे ह्यांचे हस्ताक्षर.
अन्य काही सारस्वतांची हस्ताक्षरे व महानुभाव लिपिलेखन
अन्य काही सारस्वतांची हस्ताक्षरे व महानुभाव लिपिलेखन

पिंगुळी (जि. सिंध्रुदुर्ग) येथील चित्रकथी-परंपरेतील पोथीचे एक पान:स्वयंवर कथेतील एक दृश्य.
पिंगुळी (जि. सिंध्रुदुर्ग) येथील चित्रकथी-परंपरेतील पोथीचे एक पान:स्वयंवर कथेतील एक दृश्य.
अश्र्वारूढ छत्रपत्री शाहूमहाराजांचे व्यक्तिचित्र, १८ वे शतक.
अश्र्वारूढ छत्रपत्री शाहूमहाराजांचे व्यक्तिचित्र, १८ वे शतक.
'सिनर्स डिव्हाइन' (१९४९), जलरंग-चित्र-शंकर पळशीकर.
‘सिनर्स डिव्हाइन’ (१९४९), जलरंग-चित्र-शंकर पळशीकर.
'गेंडयाची शिकार', दख्खनी कलम, सु.१६८०.
‘गेंडयाची शिकार’, दख्खनी कलम, सु.१६८०.
'फ्लोटिंग सिटीज' (१९८१), तैलरंगचित्र--बाबुराव सडवेलकर.
‘फ्लोटिंग सिटीज’ (१९८१), तैलरंगचित्र–बाबुराव सडवेलकर.
शेषशायी विष्णू (अंशदृश्य) :लाकडी ग्रंथवेष्टनावरील चित्र,१८ वे शतक.
शेषशायी विष्णू (अंशदृश्य) :लाकडी ग्रंथवेष्टनावरील चित्र,१८ वे शतक.
'जगदंबा प्रवेशद्वार' (१९२५), जलरंगचित्र--माधवराव बागल.
‘जगदंबा प्रवेशद्वार’ (१९२५), जलरंगचित्र–माधवराव बागल.
श्रीकृष्णाचा शृंगार : 'कृष्णलीला' भित्तिचित्राचा भाग, नाना फडणीस वाडा, मेणवली.
श्रीकृष्णाचा शृंगार : ‘कृष्णलीला’ भित्तिचित्राचा भाग, नाना फडणीस वाडा, मेणवली.