आर्थिकस्थिती 

 

ऐतिहासिकआढावा भारतातइंग्रजराजवटयेण्यापूर्वीचाकाळआर्थिकदृष्ट्याभरभराटीचाहोता, असेम्हणतायईल. पणहीभरभराटखालपर्यतपसरलेलीवसार्वत्रिकनव्हती. भारतत्याकाळातएकदेशअसाओळखलाजातनव्हता. देशाचेवेगवेगळेभागवेगवेगळ्याअंमलांखालीअसूनतेथीलपरिस्थितीतहीफरकहोता. त्याकाळातभारतकेवळकृषिप्रधानदेशनव्हता. शेतीआणिउद्योगधंदेयांचाभारतातसमप्रमाणातविकासझालाहोता. यूरोपीयदेशांच्याकितीतरीआधीभारतगहू, कापूसवअन्यमहत्त्वाचीपिकेपिकवीतहोता. भारतातीलउद्योगीशेतकऱ्यांनालागवडीचेविकसिततंत्रज्ञानपूर्णपणेअवगतहोते. पेरणी, कापणीचीयोग्यवेळत्यांनाठाऊकहोती. शेतीतीलनिरुपयोगीगवताचीनडणी, जमिनीचाकसवाढविण्यासाठीजमीनकाहीकाळनापीकठेवण्याचेमहत्त्व, शेतीलापाणीपुरवठाकरण्याचेविविधमार्गया तंत्रांचीत्यांनाचांगलीचमाहितीहोती. औद्योगिकक्षेत्रातहीभारतपुढारलेलाहोता. कारागिरीचेववस्तूंचेविविधप्रकारडोळ्यांतभरण्यासारखेहोते. वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सुतारकाम, कागदउद्योग, जहाजनिर्मिती, साखरवमीठउत्पादन, सुवासिकतेलांचेउत्पादन, सोन्याचांदीचेदागदागिनेतयारकरण्याचेउद्योगयांसारख्याविविधउद्योगधंद्यांच्याबाबतींतभारतअन्यदेशांच्यातुलनेनेनिश्चितचपुढेगेलेलाहोता. पणनवीन युगामध्येजेउद्योगवजीउत्पादन-पद्धतआवश्यक, त्यांचामात्रदेशातपुराअभावहोता.

 

भारतातीलवस्त्रोद्योगाचीपरंपराफारपुरातनआहे. ख्रिस्तपूर्व२०००वर्षांतईजिप्तमधीलथडग्यातील ‘ममी’ भारतातूनआयातकेलेल्याउत्तमदर्जाच्यामलमलीवस्त्रांतगुंडाळलेल्याआढळूनआल्याडाक्क्याची⇨मलमलग्रीसपर्यंतपोहोचलीहोती रोमनलोकभारतीयबनावटीच्यावस्तूंचामनसोक्तउपभोगघेतहोते. भारतीयवस्त्राचादर्जाइतकाउत्कृष्टहोतावकापडचोपडइतकेस्वस्तहोतेकी, इंग्लंडमधीलरेशमीवलोकरीकापडबनविणाऱ्याकारखानदारांच्याआग्रहावरूनभारतीयकापडाच्याआयातीवरनिर्बंधघालण्यासाठीआवश्यकतेकायदे१७००व१७२१

सालीइंग्लंडलाकरावेलागले[⟶ कापडउद्योग]. पश्चिमयूरोपम्हणजेअर्वाचीनऔद्योगिकविकासाचेउगमस्थान. परंतुत्याप्रदेशांतज्याकाळीमागासलेल्याजातिजमातींनीवस्तीकेलेलीहोती, त्याकाळातभारतातीलकारागीरउत्तमोत्तमकलात्मकवस्तूनिर्माणकरण्यातनिमग्नहोते. पश्चिमेकडूनआलेल्याधाडसीव्यापाऱ्यांनीजेव्हाभारतीयभूमीवरप्रथमपायठेवला, तेव्हाभारतऔद्योगिकविकासाच्याबाबतीतयूरोपमधीलकोणत्याहीपुढारलेल्यादेशांच्यामागेनव्हता.

 

याकाळातवाहतुकीच्यासोयीअपुऱ्याअसल्यानेअंतर्गतव्यापारहलक्यावजनाच्यापणमौल्यवानवस्तूंचातेवढाहोई. रस्तेचांगलेनव्हते बैलगाडीहेमहत्त्वाचेवाहतूकसाधनहोते. अंतर्गतजलवाहतूकगंगावसिंधूयानद्यांतूनहोतअसे. सागरीवाहतुकीनेमात्रलांबचापल्लागाठलाहोता. भारतीयबनावटीच्याजहाजांचीसर्वत्रप्रशंसाहोई.

 

याकाळातअवघेदहाटक्केलोकशहरांतहोतेवग्रामोद्योगांमुळेनव्वदटक्केलोकग्रामीणभागांतराहतहोते. शहरेनिर्माणझालीतीकाहीविशिष्टकारणांमुळे, उदा.,बनारस, जगन्नाथपुरी, गयाह्यांसारखीगावेधार्मिकक्षेत्रेम्हणूनविस्तारली विजापूर, गोवळकोंडाहीराजकीयकारणांमुळेवाढलीआणिमिर्झापूरसारखेशहरव्यापारीकेंद्रम्हणूनख्यातीपावले. क्षेत्रांच्याठिकाणीधातूंचीभांडीनिर्माणकरणारेउद्योगऊर्जितावस्थेसयेत, तरराजेरजवाड्यांच्याख्यालीखुशालीसाठीसोन्याचांदीचे हस्तिदंतीवस्तूबनविण्याचेउद्योगभरभराटीसयेत. भारतीयखेडीहीस्वयंपूर्णहोती. मीठआणिदागदागिनेसोडल्यासखेड्यांतबाहेरूनफारशावस्तूआणल्याजातनसत. सर्वगरजेच्यावस्तूंचेगावातल्यागावातउत्पादनहोई. वाहतूकवदळणवळणसाधनेअपुरीअसल्यानेखेडीबाहेरच्याजगापासूनआपोआपचवेगळीपडत. वेगवेगळेव्यवसायकरणारेसुतार, लोहार, सोनारयांसारखेकारागीरखेड्यांतीललोकांच्यागरजापुऱ्याकरीत गावकऱ्यांनाविविधतऱ्हेच्यासेवादेत. त्याबदलीत्यांनाहंगामातपिकातीलठराविकहिस्सामिळे. श्रमविभागणीसर्वसामान्यस्वरूपाचीहोती. बहुतेकव्यवसायवंशपरंपरागतचालतअसत. बाहेरच्यावस्तूअधिकदर्जेदारवस्वस्तअसल्या, तरीगावकरीआपल्यागावातीलकारागिरांना प्रोत्साहन देत, एवढेच नव्हे तर त्यांना उलट आश्रय देत. साहजिकचगावच्याकारागिरांनाबाहेरच्यास्पर्धेलातोंडद्यावेलागतनसे. परिणामीउद्योगधंद्यांचेस्थानीयीकरणझालेनाही. कारागीरखेड्यांतल्याखेड्यांतचराहिले. बाहेरच्याजगाशीत्यांचासंपर्कआलानाही, त्यामुळेत्यांच्याअंगच्यागुणांचाविकासहोऊशकलानाही. गावकरीबाहेरच्याजगातहोतअसलेल्यासुधारणावप्रगतीयांपासूनवंचितराहिले. भारतातीलहीग्रामसंरचनाअद्वितीयम्हटलीपाहिजे. अशातर्‍हेचीपूर्णपणेस्वयंपूर्णअसेललीखेडीअन्यत्रआढळणेकठीण[⟶ अलुते-बलुते ग्रामसंस्था ग्रामोद्योग].

 

एकोणिसाव्याशतकाच्याप्रारंभीचीभारतीयअर्थव्यवस्थाऔद्योगिकविकासाच्याउंबरठ्यावरहोती. शीघ्रऔद्योगिकविकासाच्या दिशेनेवाटचालकरणाऱ्यायूरोपीयदेशांच्याअर्थव्यवस्थेशीतीमिळतीजुळतीहोती. नंतरच्याकाळातपश्चिमयूरोपीयदेश, अमेरिकेचीसंयुक्तसंस्थाने, जपानयादेशांचेझपाट्यानेऔद्योगिकीकरणझाले. दुर्दैवानेभारतावरपरकीयराजवटआली. भारताचीऔद्योगिकप्रगतीखुंटूनआर्थिककुंठितावस्थेचीपरिस्थितीनिर्माणझाली. पुढारलेलेदेशआणिभारतयांमधीलअंतरवाढतगेले. कालांतरानेभारतअविकसितदेशांच्यामालिकेतजाऊनबसला.

 

भारतातनैसर्गिकसाधनसामग्रीचीकमतरतानव्हती. भारतीयांचेतंत्रज्ञानकमीप्रतीचेनव्हते. ब्रिटिशराजवटीच्यापहिल्याशंभरवर्षांतभारतातीललोकसंख्येचीवाढमंदगतीनेहोतहोती. मगआर्थिककुंठितावस्थेचीकारणेतरीकोणती ? ⇨दादाभाईनवरोजीरमेशचंद्रदत्तयांसारख्याजाणकारांनीआर्थिकदुरवस्थेचेनिदानकरतानाकुंठितावस्थेचेमुख्यकारणब्रिटिशसरकारचेविशिष्टधोरणहोय. असेम्हटलेआहे. इंग्रजप्रथमभारतातआलेतेव्यापारीम्हणून भारतासारखीमोठीबाजारपेठकाबीजकरण्याच्याउद्देशानेइंग्रजांनीआपल्या राजवटीतरस्तेबांधले, लोहमार्गाचेजाळेनिर्माणकेले, बंदरेवाढविली, अनेकनियमवकायदेकानूकेले. यामागीलप्रमुखउद्देशइंग्रजव्यापारी, उत्पादकआणिवाहतूककरणाऱ्यांचेहितसंबंधसांभाळणेहाचहोता. भारतीयउद्योग, व्यापारउदीमवाढूनयेत, नवीनउद्योगधंदेउदयासयेऊनयेतयाचीपुरेपूरकाळजीपरकीयसरकारनेघेतली. ग्रेटब्रिटनमध्येयेणाऱ्याभारतीयमालावरआयातकरलादणे, भारतात उत्पादित होणाऱ्या मालावर मोठ्या प्रमाणावर अबकारीकरबसविणे, इंग्रजव्यापाऱ्यांनाअंतर्गतकरांतूनसूटदेणे, शासकीयखात्यांसाठीमालखरेदीकरतानाब्रिटिशमालालाअग्रक्रमदेणेइत्यादींमुळेभारतीयउद्योगांचीपीछेहाटझाली तरुणप्रवर्तकांच्याउत्साहावरविरजणपडलेआणिशतकानुशतके, पिढ्यानपिढ्याचालतआलेलेकसबनष्टप्रायझाले. लक्षावधीकारागीरबेकारझालेआणिग्रामीणभागांतबहुसंख्यलोकांनादैन्यावस्थाप्राप्तझाली.


ब्रिटिशराज्यकर्त्यांनीअनेककारणांसाठीभारतातीलसंपत्तीचाओघआपल्यादेशाकडेसततचालूठेवला. भारतातनोकरीकरूननिवृत्तझालेल्याब्रिटिशअधिकाऱ्यांनाप्रचंडनिवृत्तीवेतनदेण्याचेदायित्त्वभारतावरपडले. अनेकअनुत्पादककारणांसाठीब्रिटिशांनीभारतालाकर्जेदिलीवत्याकर्जांवरीलव्याजापोटीभारतातीलसुवर्णआपल्यादेशाकडेनेले. आर्थिकविकासालापोषकठरणारीभारतीयांचीमूल्यवानबचतइंग्रजांनीआपल्यादेशाच्याप्रगतीसाठीवापरली. हीबचतभारतातराहिलीअसतीआणितीउत्पादककामासाठीउपयोगातआणलीगेलीअसती, तरभारतातीलविकासाचावेगअमेरिकेचीसंयुक्तसंस्थाने, ग्रेटबिटनइ. देशांच्याविकासदराइतकाराहिलाअसता परंतुदुर्दैवानेतसेघडलेनाही. परकीयअंमलाखालीभारताचेसततवदीर्घकाळझालेलेशोषणहेऔद्योगिकीकरणाच्यामुळाशीआलेआणिआर्थिककुंठितावस्थेलाकारणझाले.

 

दुसऱ्यामहायुद्धाचेभारतीयअर्थकारणावरसंमिश्रवदूरगामीपरिणामझाले. महायुद्धामुळेऔद्योगिकविकासालाचालनामिळाली. बाल्यावस्थेतअसलेल्याभारतीयउद्योगांचीकोंडीकरण्याचेब्रिटिशसरकारचेधोरणयाकाळातबदलले. युद्धोपयोगीमालाचीनिर्मितीव्हावीआणिनागरीगरजापुरविल्याजाव्यात, हीउद्दिष्टेडोळ्यांसमोरठेवूनसरकारनेनवनव्याउद्योगधंद्यांच्यावाढीलाप्रोत्साहनदिले. हेऔद्योगिकधोरणटंचाईवरमातकरण्याच्याउद्देशानेआखण्यातआलेहोते. त्यामुळेप्रत्यक्षातआलेलीऔद्योगिकसंरचनासमतोलनव्हती. मात्रयुद्धामुळेयंत्रसामग्रीवरअतोनातताणपडला, अनेकउद्योगांचेआधुनिकीकरणकरण्याचेराहूनगेले. साहजिकचउत्पादकशक्तीवरप्रतिकूलपरिणामझाला. याकाळातयुद्धोपयोगीकामासाठीसरकारनेदेशातीलचलनरु. १८२कोटींवरूनरु.१,३२०कोटींपर्यंतम्हणजेजवळजवळसातपटींनीवाढविले. त्यामानानेउत्पादनातवाढझालीनाही. कृषिउत्पादनदुपटीनेवाढले तथापिऔद्योगिकउत्पादनाततेवढीहीवाढझालीनाही. परिणामीकिंमतवेगानेवाढल्या, काळ्याबाजारालाऊतआलाआणिगरिबांचीस्थितीअधिकचदयनीयबनली. याचेएकउदाहरणम्हणजे, १९४३सालीबंगालमध्येपडलेल्याभयंकरदुष्काळातक्रयशक्तीच्याअभावीअन्नधान्यखरेदीकरणेअशक्यझाल्याने१५लाखलोकउपासमारीनेप्राणासमुकले[⟶ दुष्काळ].

 

युद्धकाळातनियंत्रणांचेएकनवेपर्वसुरूझाले. परकीयहुंडणावळ वस्तूंचीआयात अन्नधान्यकापड, साखर, सिमेंट, पोलादयांचेवाटप कंपन्यांचीभांडवलउभारणीयांसारख्याअनेकविधगोष्टींवरनियंत्रणेलादण्यातआली. स्वातंत्र्योत्तरकाळातभारतसरकारनेनियंत्रणांचावारसापुढेचालविलाआणिपुढेहीनियंत्रणेआर्थिकनियोजनाचाअपरिहार्यभागहोऊनबसली.

 

हिदुस्थानची१९४७मध्येफाळणीझाली, याघटनेचेभारतीयअर्थकारणावरदूरगामीपरिणामघडूनआले. देशाचीविभागणीझाल्यावरत्याचा७७टक्केभूभागआणि८२टक्केलोकसंख्याभारताच्यावाट्यालाआली. त्यामुळेलोकसंख्येच्याघनतेचेप्रमाणअतिरिक्तराहिले, पंजाबमधीलगहूपिकविणाराआणिबंगालमधीलतागपिकविणारासुपीकभागपाकिस्तानकडेगेला. फाळणीनंतरसु.७५लाखनिर्वासितपूर्व-पश्चिमपाकिस्तानकडूनभारतीयभूमीकडेआलेवत्यांच्यापुनर्वसनासाठीभारतालाकोट्यावधीरुपयेखर्चावेलागले[⟶ निर्वासित]. पुढीलकाळातभारत-पाकराजकीयसंबंधताणतणावांचेराहिल्यानेआर्थिकविकासासाठीखर्चावयाचीरक्कमअनुत्पादकसंरक्षणखर्चाकडेवळवावीलागली. पाकिस्तानबरोबरझालेलीयुद्धे (१९४७, १९६५, १९७१), बांगलादेशाच्यानिर्मितीपूर्वीनिर्वासितांचाभारताकडेआलेलाओघ, युद्धकैद्यांचीदेखभालकरण्यासाठीझालेलाप्रचंडखर्चयांसारख्याघटनांचाभारतीयअर्थव्यवस्थेवरविपरीतपरिणामझाला.

 

विसाव्याशतकाच्याप्रारंभापासूनभारतस्वतंत्रहोईपर्यंतच्या४७वर्षांच्याकाळातदरडोईउत्पन्नफक्त२०टक्क्यांनीवाढले. राष्ट्रीयउत्पन्नातीलशेतीचावाटा६३टक्क्यांवरून४६टक्क्यांवरआला उद्योगधंदेवसेवाक्षेत्राचावाटा१३व२४वरूनअनुक्रमे१७व३७पर्यंतवरगेला. यावरूनऔद्योगिकीकरणाचावेगवाढल्याचेस्पष्टदिसूनयेते. शतकाच्याप्रारंभी७०टक्केलोकसंख्याउदरनिर्वाहासाठीशेतीवरअवलंबूनहोती. भारतस्वतंत्रझालातेव्हाहीहेप्रमाणबदललेलेनव्हते. जगातीलकोणत्याहीअविकसितदेशाप्रमाणेभारतकृषिप्रधानदेशराहिलावआज१९८३मध्येहीतेचित्रफारसेपालटलेलेनाही.

 

कृषि भारताच्याएकूण३२.८८कोटीहे. भोगोलिकक्षेत्रापैकी (१९७८-७९) जवळजवळ४३.४टक्के (१४.२९कोटीहे.) भूभागलागवडीखालीहोता. एकूणभूभागापैकी२०.५टक्के (६.७४कोटीहे.) जमीनवनप्रदेशानेव्यापलेलीअसूनसु. ३.७टक्के (१.२२कोटीहे.) जमीनकुरणांसाठीआणिगुरचराईसाठीउपयोगातआणलीजातहोती. एकूण५.४टक्केम्हणजे१.७८कोटीहे. जमीनइमारती, रस्तेआदीबिगर-शेतीकामासाठीवापरलीजातहोती. उर्वरितभूभागबव्हंशीनापीक, लागवडीसअयोग्यअसाआहे. एकूणएक-तृतीयांशभूभागवनविस्तारासाठीउपयोगातआणावयाचेराष्ट्रीयधोरणपाहता, यापुढेआणखीजमीनलागवडीसाठीमिळणेदुष्करआहे. त्यामुळेशेतीउत्पादनातवाढकरावयाची, तरविस्तृतशेतीऐवजीसघनशेतीचाअवलंबकरणेआवश्यकआहेहेउघडआहे. लागवडीखालील जमिनीपैकीअंदाजे९टक्केजमिनीतदुबारपिकेकाढलीजातात.कोष्टक क्र. १० मध्ये वापरानुसार जमिनीच्या क्षेत्राची आकडेवारी दिलेली आहे.

कोष्टक क्र. १० वापरानुसार जमिनीचे क्षेत्र (कोटी हेक्टरांमध्ये)
१९७४-७५  १९७८-७९ 
१. एकूण भौगोलिक क्षेत्र  ३२.८८ ३२.८८
२. कोष्टकासाठी माहिती उपलब्ध झालेली जमीन ३०.४२ ३०.४७
३. जंगले ६.५९  ६.७४ 
४. लागवडीसाठी अनुपलब्ध क्षेत्र : 

(अ) बिगरशेतीसाठी वापरलेली जमीन

१.७१ १.७८
(आ) ओसाड व नापीक जमीन २.३६  २,१५ 
एकूण    ४.०७  ३.९३ 
५. इतर पडीक जमीन : 

(अ) कायम कुरणे व चराऊ राने

१.२९ १.२२
(आ) पिकांखालील जमीन वउपवने ०.४१  ०.३९ 
(इ) नापीक जमीन १.६७  १.७० 
एकूण    ३.३७ ३.३१
६. पडीक जमीन : 

(अ) चालू पडीक जमीन

१.६२ १.२४
(आ) इतर पडीक जमीन ०.९३  ०.९६ 
एकूण    २.५५ २.२०
७. लागवडीखालील निव्वळ क्षेत्र १३.८४ १४.२९
८. एकापेक्षा अधिक वेळा लागवडीखालील क्षेत्र २.५८  ३.२२ 
९. पिकांखालील एकूण जमीन १६.४२  १७.५१ 
१०. ओलिताखालील निव्वळ क्षेत्र ३.३७ ३.८०
११. ओलिताखालील स्थूल क्षेत्र ४.१७  ४.८१ 

कोष्टक क्र. ११. प्रमुख पिके-क्षेत्र (००० हे.) व उत्पादन (००० मे. टनांमध्ये).
पिकाचे नाव १९५०-५१  १९६०-६१ १९७०-७१  १९७७-७८ १९७९-८०
क्षेत्र उत्पादन क्षेत्र उत्पादन क्षेत्र उत्पादन क्षेत्र उत्पादन क्षेत्र उत्पादन
       
भात ३०,८१० २२,०५८ ३४,१२८ ३४,६०० ३७,५९२ ४२,२२५ ४०,२८३ ५२,६७० ३८,९८० ४२,१९०
ज्वारी १५,५७१ ६,२५० १८,४१२ ९,८९९ १७,७७४ ८,१०५ १६,३१८ १२,०६४ १६,४५० ११,३२०
बाजरी ९,०२३ २,६८० ११,४६९ ३,२८६ १२,१९३ ८,०२९ ११,१०४ ४,७३० १०,६०० ४,०३०
मका ३,१५९ २,३५७ ४,४०७ ४,११५ ५,८५२ ७,४८० ५,६८३ ५,९७३ ५,७५० ५,५८०
नाचणी २,२०३ १,३५३ २,५१५ १,८७६ २,४७२ २,१५५ २,६०० २,८६६ २,५८० २,७००
बारीक तृणधान्ये ४,६०५ १,७७६ ४,९५५ २,०१० ४,७८३ १,९८८ ४,५७४ २,०७० ४,०९० १,४८०
गहू ९,७४६ ६,८२२ १२,९२७ १०,९९५ १८,२४१ २३,८३२ २१,४५६ ३१,७४९ २१,९६० ३१,५६०
बार्ली ३,११३ २,५१८ ३,२०५ २,८११ २,५५५ २,७८४ २,००१ २,३११ १,७५० १,६२०
एकूण ७८,२३० ४५,८१४ ९२,०१८ ६९,५९२ १,०१,७८२ ९६,६०४ १,०४,०१८ १,१४,४३४ १.०२,१६० १,००,४८०
कडधान्ये
हरभरा ७,५७० ३,८२३ ९,२७६ ६,२५६ ७,८३९ ५,१९९ ७,९७४ ५,४१० ६,८३० ३,२८०
तूर २,१८१ १,८१३ २,४३३ २,०९७ २,६५५ १,८८३ २,६२६ १,९३० २,६७० १,७४०
इतर कडधान्ये ९,३४० ३,५६१ ११,८५४ ४,३८१ १२,०४० ४,७३६ १२,८९७ ४,६३३ १२,२५० ३,३५०
एकूण अन्नधान्ये ९७,३२१ ५५,०११ १,१५,५८१ ८२,३२६ १,२४,३१६ १,०८,४२२ १,२७,५१५ १,२६,४०७ १,२३,९१० १,०८,८५०
नगदी पिके
ऊस १,७०७ ७०,४९० २,४१५ १४,०८० २,६१५ २६,३६८ १५१ १,७६,९६६ २,६६६.१ १३,३३०.२०
काळी मिरी ८० २० १०३ २८ १२० २८ ११२ २६ ८४.९१ २१.९८
सुकी मिरची ५९२ ३५८ ६६७ ४२६ ७८३ ५२० ७९१ ५४३ ८२६.३ ५१०.९
भुईमूग ४,४९४ ३,३१९ ६,४४३ ४,६९८ ७,३२६ ६,१११ ७,०२९ ६,०८३ ७,२३८.२ ५,७७१.८
एरंडी ५५५ १०७ ४६६ १०९ ४३९ १३६ ३८० २१७ ४३७.५ २३२.७
तीळ २,२०४ ४२२ २,१६९ ३२० २,४३३ ५६२ २,३८४ ५२० २,३८४.८ ३७०.७
मोहरी २,०७१ ७६८ २,८८३ १,३४७ ३,३२३ १,९७६ २,३८९ १,६५० ३,४७४.७ १,४३३.१
अळशी १,४०३ ३६४ १,७८९ ३९५ १,८९७ ४७४ ३,५८४ ५२७ १,६४०.५ २६९.७
कापूस (०००गासड्या) ५,८८२ ३,०३९ ७,६१० ५,५५० ७,६०५ ४,७६३ २,०१० ७,२४३ ८,०७७.५ ७,६९७.६
ताग (०००गासड्या) ५७१ ३,४९७ ६२९ ४,१३६ ७४९ ४,९३८ ७,८६६ ५,३६१ ८४२.४ ६,१२०.४
अंबाडी ०००गासड्या) अनुपलब्ध ६५९ २७४ १,११३ ३३० १,२५५ ७९७ १,७९३ ३८४.९ १,९०८.३

नारळीबाग : सागरकिनारपट्टीवरील महत्त्वाचे नगदी पीक.

भारतातजमिनीचेविविधप्रकारववेगवेगळ्याभागांतवेगवेगळ्याप्रकारचेहवामानअसल्यानेसर्वप्रकारचीपिकेहोतात. अन्नधान्यपिकांसप्राधान्यआहे. जवळजवळ८५टक्केजमिनीतअन्नधान्यउत्पादनव१५टक्केजमिनीतबिगर-धान्यउत्पादनकेलेजाते. भारतातीलप्रमुखअन्नधान्यपिकांवरउदा. गहू, ज्वारी, बाजरी, भातइ. वेगवेगळीकडधान्येतसेचऊस, कापूस, ताग, तंबाखू, नारळ, भुईमूगयांसारख्यानगदीपिकांवर विश्वकोशातस्वतंत्रनोंदीअसूनत्यातभारतातीलत्यात्यापिकांबद्दलअधिकमाहितीदेण्यातआलीआहे.

 

अन्नधान्यांच्याबाबतीतसर्वाधिकजमीनभाताखाली असूनत्याखालोखालडाळी, गहू, ज्वारी, बाजरीआणिमकायांचाक्रमांकलागतो. भातउत्पादनातभारताचाजगातचीनखालोखालदुसराक्रमांकलागतो. भारतातीलभाताखालीलजमीनजगातीलभाताखालीलएकूणजमिनीच्याएक-तृतीयांशआहे. गव्हाच्याबाबतीतएकूणलागवडीखालीलजमीनपाहूजाता, भारताचाअमेरिकेचीसंयुक्तसंस्थानेवकॅनडायांपाठोपाठतिसरावएकूणउत्पादनाच्याबाबतीतजगातसहावाक्रमांकआहे. गव्हाचेदरहेक्टरीउत्पादनअन्यगहूपिकविणाऱ्याअनेकदेशांच्यातुलनेनेकमीआहेहेउघडआहे. तूर, हरभरा, मसूर, उडीदयांसारख्यापिकांचेउत्पादनदेशाच्याबहुतेकभागांतहोते.

 

दार्जिलिंगच्या चहामळ्याचे दृश्य
ताग : देशातील एक महत्त्वाचे नगदी पीक.

नगदीपिकांतसर्वाधिकजमीनतेलबियांखालीआहे. भुईमूग, एरंडी, तीळ, जवस, मोहरीयामहत्त्वाच्यातेलबियाहोत. त्याखालोखालमहत्त्वाचेपीकम्हणजेकापूस कापसानंतरउसाचाक्रमांकलागतो. जगातऊसउत्पादनातभारतप्रथमक्रमांकाचादेशआहे. तंबाखू उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. ताग हे आणखी एक महत्त्वाचे नगदी पीक. ताग उत्पादनात अखंड भारताची मक्तेदारी होती. फाळणीनंतर ताग उत्पादन करण्यासाठी एक तृतीयांशाहून कमी जमीन भारताकडे राहिली. त्यामुळे उत्पादन वाढविण्यासाठी भारताने नेटाचे प्रयत्न केले. भारत आज तागमालाची सर्वाधइक निर्यात करतो. चहाच्या लागवडीखालील जमीन आणि उत्पादन या दोन्ही बाबतींत भारताचाजगातदुसराक्रमांकलागतो. नारळपिकविणाऱ्यादेशांतहीभारताचादुसराक्रमांकआहे. कॉफी,रबरवसिंकोनायांचेहीउत्पादनभारतातहोते. कोष्टकक्र.११मध्येभारतातीलप्रमुखपिकांच्यालागवडीखालीलक्षेत्राचेवउत्पादनाचेआकडेदिलेलेअसूनकोष्टकक्र.१२अन्नधान्योत्पादनाची आकडेवारी स्पष्टकरते.

कोष्टकक्र.१२ अन्नधान्योत्पादन 
वर्ष  कोटीटन 
१५५०-५१ ५.५०
१९५५-५६ ६.६९
१९६०-६१ ८.२३
१९६६-६७ ७.४२
१९७०-७१ १०.८४
१९७७-७८ १२.६४
१९७८-७९ १३.१९
१९७९-८० १०.९७
१९८०-८१ १२.९८

पशुधनजगातीलसर्वाधिकपशुधन (एक-षष्ठांशम्हणजेच१५टक्क्यांहूनअधिक) भारतातआहे. जगातीलनिम्म्याम्हशी, वीसटक्क्यांहूनअधिकशेळ्यावमेंढ्याआणिसु. वीसटक्केगुरेभारतातआहेत. पशुधनाच्याबाबतीतचीनचादुसराक्रमांकलागतो. मांस, दुग्धव्यवसाय, लोणी, चीजयांचेउत्पादनयांसारखेपशुधनजन्यउद्योगऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, इटली, हॉलंड, स्वित्झर्लंडइत्यादीदेशांतचांगलेचविकसितझालेआहेत, पणपशुधनबहुतेकदेशांतएकटक्क्याहूनअधिकनाही. पशुधनाचेप्रमाणस्वातंत्र्योत्तरकाळातवाढतगेल्याचेदिसते. १९५६मध्येते३०.६कोटीहोते १९६६मध्येहाआकडा३४.४कोटींवरगेलाव१९८०मध्येतो५१,५७,८८,०००एवढाहोता. कोष्टकक्र.१३व१४यांमध्येपशुधनवपशुधनजन्यपदार्थयांचीआकडेवारीदिलेलीआहे

एवढ्या प्रचंड पशुधनासाठी पुरेशी कुरणे भारतात नाहीत. भारतात एकूण पिकणारा चारा साठा टक्के जनावरांना पुरा पडण्यासारखा आहे. या जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा अत्यल्प आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा सु. ४५ टक्के आहे व शेती उत्पन्नात पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण अवघे १६ ते १७ टक्के आहे. डेन्मार्क, स्वीडन, ग्रेट ब्रिटन, हॉलंड या देशांत हे प्रमाण सु. ८० टक्के आहे.

कोष्टक क्र.१३ पशुधन 

(अन्न व शेती संघटनेच्या अंदाजानुसार-लाखांत)

प्रकार १९७८ १९७९ १९८०
गुरे १,८१९·९२ १,८१८·४९ १,८२५·००
मेंढ्या ४०७·०० ४१०·०० ७१३·००
शेळ्या ७०५·८० ७१०·०० ७१६·५०
डुकरे ९४·१० ९९·०० १००·००
घोडे ७·७१ ७·६० ७·६०
गाढवे १०·०० १०·०० १०·००
खेचरे १·२५ १·२५ १·२८
म्हशी ६०६·९८ ६०६·५१ ६१३·००
उंट ११·५० ११·५० ११·५०
कोंबड्या १,४४०·०० १,४५०·०० १,४६०·००

गुरांना पुरेसा चारा व पोषक खाद्यवस्तू मिळत नसल्याने त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण फारच कमी असते. गोमांसाचे प्रमाण अत्यल्प बोकड, मेढ्या याचे मांस अधिककरून उपलब्ध होते, त्यामुळे एकूण पशुधनात गुरांचे प्रमाण जवळजवळ निम्मे असले, तरी एकूण राष्ट्रीय उत्पन्नात त्याचे योगदान अत्यल्प आहे. जनावरांच्या औषधोपचाराच्या सोयी ग्रामीण भागांत वाढत असल्याने एकूण गुरांच्या संख्येत म्हाताऱ्या, निकामी जनावारांचे प्रमाण फार मोठे आहे. जनावरांच्या अतिरिक्त संख्येचा कृषिअर्थव्यवस्थेवर मोठाच ताण पडल्याचे दिसते.

कोष्टक क्र.१४ पशुजन्य उत्पादने 

(अन्न व शेती संघटनेच्या अंदाजानुसार, लक्ष मे.टन)

प्रकार १९७८ १९७९ १९८०
गोमांस ०·७१ ०·७२ ०·७४
म्हशीचे मांस १·२० १·२० १·२३
मेंढीचे मांस १·१९ १·२० १·२२
शेळीचे मांस २·७७ २·७८ २·८०
डुकराचे मांस ०·६६ ०·६७ ०·७०
कोंबडीचे मांस १·०६ १·०७ १·०९
गाईचे दूध १२१·८० १२६·०० १३०·००
म्हशीचे दूध १५९·५० १६५·०० १७०·००
शेळीचे दूध ८·७० ९·०० ९·३०
लोणी व तूप ५·७० ५·८१ ५·८८
अंडी ०·८६ ०·८७ ०·८८
लोकर :
चरबीयुक्त ०·३४५ ०·३५६ ०·३६
स्वच्छ केलेली ०·२२४ ०·२२७ ०·२३४
गुरे व म्हशी यांची कातडी ७·७१ ७·७१ ७·९०
मेंढ्याची कातडी ०·३५८ ०·३६४ ०·३६७
शेळ्यांची कातडी ०·७०९ ०·७१३ ०·७२०

भारतात लागवडीखालील एकूण शेतीपैकी सु. ८० टक्के जमीन आजही पर्जन्यमानावर अवलंबून आहे. पावसाने दगा दिला, अवर्षण वा अतिवृष्टी झाली म्हणजे शेतीला अवकळा येते आणि देशाचे अर्थकारण कोलमडून पडते. पुरेसा व योग्य अंतराने पडणारा पाऊस शेतीला आवश्यक असतो. भात आणि ऊस यांसारख्या पिकांना नियमित व पुरेशा पाणीपुरवठ्याची गरज असते. लहरी निसर्गावर सर्वस्वी अवलंबून राहणे धोक्याचे असल्याने पाणीपुरवठ्याच्या कृत्रिम सोयी करणे अपरिहार्य होऊन बसते. विहिरी, नलिकाविहिरी, तलाव व कालवे हे पाणीपुरवठ्याचे भारतातील चार प्रमुख मार्ग [→ सिंचन].

भारतातील एकूण जलसंपत्ती पृष्ठभाग आणि भूमिगत अशा दोन भागांत विभागता येते. पृष्ठभागावरील एकूण जलसंपत्तीच्या ३३ टक्के भागाची वाफ होते. २२ टक्के भाग जमिनीत मुरतो आणि उरलेला ४५ टक्के कृत्रिम पाणीपुरवठा सोयीसाठी उपलब्ध होतो, असे आढळून आले आहे. त्यांपैकी सर्व जलसंपत्ती उपयोगात आणता येत नाही केवळ ३३ टक्के पाण्याचा पाणीपुरवठा योजनांसाठी उपयोग करता येतो. परंतु पृष्ठभागावरील जलसंपत्ती व भूमिगत जलसंपत्ती जेवढ्या प्रमाणात उपयोगात आणता येईल, त्याच्या ४० टक्के भागही नीटसा वापरता आणण्यात आलेला नाही, असे तज्ञांचे मत आहे. शेतीसाठी व उद्योधंद्यांना वीजपुरवठा करण्यासाठी जलसंपत्तीचा अधिकाधिक उपयोग होणे जरूर आहे. अस्तित्वात असलेल्या जलसंपत्तीचा काळजीपूर्व उपयोग केला, तर दोन्ही क्षेत्रांतील उत्पादनवाढ मोठ्या प्रमाणावर होण्यास वाव आहे, अस निष्कर्ष यातून निघतो. कोष्टक क्र.१५ वरून भारतातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांद्वारे संभाव्य व प्रत्यक्ष जलसिंचित क्षेत्राची कल्पना येते. [→ धरणे व बंधारे नदी खोरे योजना].

कोष्टक क्र. १५. मोठ्या व मध्यम प्रकल्पांद्वारे संभाव्य व प्रत्यक्ष जलसिंचित क्षेत्र. 
काळ क्षेत्र (लक्ष हेक्टरांत)
संभाव्य प्रत्यक्ष
नियोजनपूर्व ९७ ९७
पहिली योजना (१९५१-५६) १२२ ११०
दुसरी योजना (१९५६-६१) १४३ १३०
तिसरी योजना (१९६१-६६) १६५ १५२
वार्षिक योजना (१९६६-६९) १८१ १६८
चौथी योजना (१९६९-७४) २०७ १८७
पाचवी योजना (१९७४-७८) २४८ २१२
१९७८-८० २६६ २२६
१९८१-८२ २९० २४६

भारतातील ८० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. शेती हे ७० टक्के लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. उरलेल्या १० टक्क्यांपैकी बहुसंख्य लोक ग्रामीण उद्योगधंद्यात गुंतलेले आहेत. गूळ, ताड गुळ, खांडसरी, तेलघाणे, साबण तयार करण्याचे कारखाने, हाताने कागद करण्याचे कारखाने, कांबळी विणणे, मधुमक्षिकापालन, आगपेटी बनविण्याचे छोटे कारखाने, सूतकताई, हातमाग, कुंभारकाम, चर्मोद्योग, काथ्या बनविणे यांसारख्या अनेक व्यवसायांवर ते अवलंबून राहतात आणि उपजीविका करतात (कूटिरोद्योग ग्रामोद्योग). मात्र काही लोक कृषिक्षेत्राशी संलग्न अशा शेतमालाचा साठा, शेतमालावरील प्रक्रिया, व्यापार, वाहतूक यांसारख्या व्यवसायांत गुंतलेले आहेत. (कृषिविपणन) शहरातील लोकसंख्येचा बराच मोठा भाग शेतलामाचा बाजार, शेतमालाची निर्यात आदी व्यवसाय करीत असतो. सारांश, भारतातील ७५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आज शेती व शेतीशी संलग्न व्यवसायांत गुंतलेली आहे. बव्हशी पर्यन्यमानावर अवलंबून असणारी भारतीय शेती खूपच मागासलेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व वारसाविषयक विशिष्ट कायद्यांमुळे जमिनीचे सतत विभाजन व अपखंडन होत आहे. जमिनीचा छोटा आकार, शेतीसाठी वापरण्यात येणारी जुन्या पद्धतीची अवजारे, शेती करण्याची परंपरागत पद्धत, शेतकऱ्यांचे आत्यंतिक दारिद्र्य, केवळ २०% जमिनीला होणारा कृत्रिम पाणीपुरवठा यांसारख्या अनेक कारणांमुळे जमिनीची दरहेक्टरी उत्पादकता खूपच कमी म्हणजे अन्य प्रगत देशांच्या तुलनेने ३३% वा २५% इतकी आहे. काही पिकांच्या बाबतीत उत्पादकता यांहून कमी आहे. उपलब्ध जलसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग करून कृत्रिम पाणीपुरवठ्याच्या सोयी वाढविल्या, दुबार पीक काढण्याच्या पद्धतीचा सर्रास अवलंब केला, शक्य तेथे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला, तर कृषी उत्पादन चौपट ते पाचपट वाढविता येईल. असा निर्वाळा तज्ञांनी दिला आहे. पंजाब व हरयाणा राज्यांत १९७० च्या सुमारास सुधारित बी-बियाण्यांचा व सेंद्रिय खतांचा वापर करणारी नवी कृषिपद्धती अंमलात आणली गेली, तेव्हा गहू, बाजरी, मका, उस या पिकांचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात वाढले. शेती उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढविण्याऱ्या या उपक्रमांचा निर्देश ⇨ हरित क्रांती म्हणून पुष्कळदा केला जातो. सधन शेतीचे पद्धतशीर व नेटाने प्रयत्न झाले, तर शेतीची उत्पादकता अनेक पटींनी वाढेल व सध्याच्या लोकसंख्येच्या तिप्पट लोकसंख्येस पुरेल इतके अन्नधान्य भारत पिकवू शकेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. [→ कृषि कृषिविकास, भारतातील].