बेरिलियमाशिवाय इतर मूलद्रव्ये MH2 (M = धातू) अशी हायड्राइडे हायड्रोजनाशी संयोग करून तयार करतात. ही सर्वक्षपणके आहेत व पाण्याबरोबरील विक्रियेत हायड्रोजन तयार करतात. बेरिलियम वमॅग्नेशियम हायड्राइडे बहुधा सहसंयुगी बहुवारिके [⟶ बहुवारिकीकरण] आहेत व इतर हायड्राइडे आयनी आहेत. सर्व मूलद्रव्ये हॅलोजनाशी विक्रिया करून MX2 सारखी हॅलाइडे तयार करतात. यांची M3N2 अशा सूत्राची नाइट्राइडे तयार होतात. यांची कार्बाइडेही तयार होतात. Ca, Sr व Ba यांची MC2 अशी कार्बाइडे तयार होतात व पाण्याच्या विक्रियेने त्यांच्यापासून ॲसिटिलीन (C2H2) व हायड्रॉक्साइडे मिळतात. बेरिलियमाच्या बेरिलियमाच्या Be2C या कार्बाइडावर पाण्याची विक्रिया केल्यास ॲल्युमिनियमाच्या AI2C3 या कार्बाइडाप्रमाणे मिथेन (CH4) मिळतो. MgC2 तापविल्यास त्यापासून Mg2C3 असे कार्बाइड मिळते व ते पाण्याबरोबर ॲलिनीन (मिथिल ॲसिटिलीन) देते.

बेरिलियम व मॅग्नेशियम जटिल संयुगे तयार करतात. ⇨ हरितद्रव्य (क्लोरोफिल) हे मॅग्नेशियमाच्या जटिल संयुगाचे उत्तम उदाहरण होय. Ca, Sr, Ba ही मूलद्रव्ये प्रबल जटिल कारकाबरोबरच जटिल संयुगे तयार करू शकतात.ॲसिटिल ॲसिटोन व एथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटिक अम्ल (EDTA) याविक्रियाकारकांशी त्यांची जटील संयुगे तयार होऊ शकतात.

कर्णसंबंध:या गटातील पहिले मूलद्रव्य बेरिलियम हे इतरांपासून गुणधर्मांनी निराळेआहे. त्याचे तिसऱ्या गटातील ॲल्युमिनियमाशी साधर्म्य आहे. पुढीलमुद्यांवरून त्याचे इतरांशी असलेले वेगळेपण व ॲल्युमिनियमाशी असलेलेसाधर्म्य विशद होईल : (१) बेरिलियमाचा अणू इतरांपेक्षा लहान असल्यानेत्यावर विद्युत् भाराची घनता जास्त आहे. त्यामुळे सहसंयुजी संयुगे तयारकरण्याची प्रवृत्ती इतरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बेरिलियमाच्यासंयुगांचे वितळबिंदू इतरांच्या संयुगांच्या मानाने कमी आहेत. उदा., BeF2 चा वितळबिंदू ८००से. आहे, तर इतरांच्या फ्ल्युओराइडांचा वितळबिंदू १३००से. च्या आसपास आहे. (२) गट १ अ व गट २ अ यांतील मूलद्रव्यांची जटिलसंयुगे तयार करण्याची प्रवृत्ती नाही परंतु गट ३ अ मधीलमूलद्रव्यांप्रमाणे बेरिलियमाची जटिल संयुगे तयार होतात. (३) बेरिलियम धातूॲल्युमिनियम धातूप्रमाणे नायट्रिक अम्लाबरोबर निष्क्रिय होते. (४)बेरिलियम ॲल्युमिनियमाप्रमाणे उभयधर्मी आहे. तिच्यावर सोडियमहायड्रॉक्साइडाची विक्रिया होऊन हायड्रोजन निघतो व बेरिलेट तयार होते. अशाविक्रियेने ॲल्युमिनियमापासून ॲल्युमिनेटे तयार होतात. (५) Be2C व AI4C3 यांच्या जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे होण्याच्या क्रियेने) मिथेन तयार होतो.

P वर्ग मूलद्रव्ये : गट ३ अ :[ बोरॉन (B), ॲल्युमिनियम (Al), गॅलियम (Ga), इंडियम (In), आणि थॅलियम (Tl)]. या गटातीलमूलद्रव्यांच्या अणूंचा इलेक्ट्रॉनविन्यास पाहता त्यांच्या शेवटच्याकक्षेत s परिकक्षेचे दोन व p परिकक्षेचे एक असे तीन इलेक्ट्रॉन आहेत.त्यामुळे त्यांची संयुजा तीन आहे असे दिसून येते. या गटात बोरॉन वॲल्युमिनियम यांचा एक व गॅलियम, इंडियम आणि थॅलियम यांचा एक असे दोन उपगटपडतात व त्यांच्या गुणधर्मातही फरक आढळतो. याचे कारण B व Al यांचे संयुजीइलेक्ट्रॉन गेले की, मागे अक्रिय वायूंची (He व Ne) संरचना शिल्लक राहते व Ga, In व Tl यांत ती असत नाही. या मूलद्रव्यांपैकी Al हे निसर्गात विपुलप्रमाणात आढळते आणि बाकीची अल्प प्रमाणात आढळतात.

बोरॉन हे मूलद्रव्य अधातू आहे आणि स्तंभात वरून खाली (B ⟶ Tl) धातवीय गुणविशेष वाढत जातो. Tl हे मूलद्रव्य पूर्णतया धातू आहे. तथापिया गटातील धातू दुर्बल आहेत. आयनांचे लहान आकारमान, त्यांचा उच्च विद्युत्भार व आयनीकरण वर्चसाचे उच्च मूल्य यांवरून या मूलद्रव्यांची संयुगेबव्हंशी सहसंयुजी आहेत, असे अनुमान काढता येते. बोरॉनाशिवाय इतर मूलद्रव्येफक्त p1 इलेक्ट्रॉन वापरून एक संयुजादेखील दाखवतात. B व Al यांची त्रिसंयुजी संयुगे तयार होतात. Al ची एकसंयुजी AICI व AIBr अशीसंयुगेही तयार होतात. Tl ची एकसंयुगे तयार करण्याचा कल सर्वांत अधिक आहे.

या मूलद्रव्यांची ऑक्साइडे त्रिसंयुजी आहेत. या ऑक्साइडांच्या गुणधर्मांवरून त्यांचा अधातवीय गुणविशेषापासून धातवीय गुणविशेष कसा वाढत जातो ते दिसून येते.

B2O3 Al2O3 Ga2O3 In2O3 Tl2O3
अम्लिय उभयधर्मी उभयधर्मी क्षारीय क्षारीय

ही मूलद्रव्ये जटिल संयुगे तयार करतात. बोरॉनाची हायड्राइडे किंवा बोरोने  [⟶ बोरॉन] तयार होतात. Al, Ga व In ही मूलद्रव्ये वैशिष्ट्यपूर्ण समरूपी तुरट्या तयार करतात. [⟶ तुरटी].


गट ४ अ: [कार्बन (C), सिलिकॉन (Si), जर्मेनियम (Ge), कथिल (Sn) आणि शिसे (Pb)]. या गटातील मूलद्रव्यांचा इलेक्ट्रॉन विन्यास असे दर्शवितो की, यांच्याअणूंच्या शेवटच्या कक्षेत s परिकक्षाचे दोन व p परिकक्षाचे दोन असे चारइलेक्ट्रॉन आहेत. यांची संयुजा चार होते परंतु कथिल व शिसे यांच्याबाबतीत दोन p इलेक्ट्रॉन निघून गेले की, उरलेली s2 इलेक्ट्रॉनांची जोडी निष्क्रिय बनते व त्यांची संयुजा दोनही असू शकते. कार्बन व सिलिकॉन यांची संयुगे सहसंयुजी असतात. अधातूपासून धातूकडेजाण्याचा कल वाढत्या अणुक्रमांकाबरोबर वाढत जातो. कार्बन व सिलिकॉन हीमूलद्रव्ये अधातू आहेत व बाकीची धातू आहेत. कार्बन व कथिल बहुरूपतादर्शवितात.

कार्बन हा या गटातील पहिला सदस्य असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे साखळीसारखी व वलयी संयुगे तयार करणे [⟶ कार्बन]. कार्बनाची असंख्य संयुगे आहेत [⟶ कार्बनी रसायनशास्त्र ॲलिफॅटिक संयुगे ॲरोमॅटिक संयुगे]. सिलिकॉन काही अंशी कार्बनसारखी साखळी व वलयी संयुगे तयार करू शकते [⟶ सिलिकॉन]. कार्बन व सिलिकॉन ही इतरांपासून वेगळ्या गुणधर्मांची आहेत या गटातीलमूलद्रव्यांमध्ये फारसा सुसंवाद नाही. तथापि काही गुणधर्म सारखे आहेत, तेपुढीलप्रमाणे: (१) सर्वांची संयुजा ४ आहे कथिल व शिसे यांचीसंयुजा २ व ४आहे. (२) सर्व मूलद्रव्ये बहुरूपता दाखवितात.त्यातल्या त्यात विशेषकरूनकार्बन व कथिल, बहूरूपता ही असंक्रमणी मूलद्रव्यांत आवर्त सारणीतील गट ४, ५व ६ यांमधील मूलद्रव्यात दिसून येते. (३) सर्व मूलद्रव्ये XO2 या सूत्राची ऑक्साइडे तयार करतात.त्यात C, Si व Ge यांची ऑक्साइडे अम्लिय आहेत आणि Sn व Pb यांची उभयधर्मी आहेत. (४) सर्व MH4 सूत्राची हायड्राइडे तयार करतात.या हायड्राइडांचे स्थैर्य C ते Pb कमी होत जाते (५) सर्वांची XCI4 अशा सूत्राची द्रवरूप क्लोराइडे तयार होतात.  (६) सर्व कार्बनी (जैव)संयुगे तयार करतात परंतु कार्बनाइतकी कोणीच तयार करत नाही. (७) कार्बन वसिलिकॉन यांचा वितळबिंदू अतिशय उच्च आहे.

गट ५ अ: [नायट्रोजन(N), फॉस्फरस(P), आर्सेनिक (As), अँटिमनी (Sb) आणि बिस्मथ(Bi)]. या गटातील मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत s2 व p3 असे पाच इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे त्यांची संयुजा ३ व ५ अशी आहे.नायट्रोजनाची संयुजा १ ते ५ आहे. चौथ्या गटाप्रमाणे हाही गट अधातू तेदुर्बल धातू असलेला आहे. नायट्रोजन व फॉस्फरस हे अधातू आहेत, आर्सेनिक हेधात्वाभ (धातू व अधातू या दोहोंचे गुणधर्म असलेले ) आहे आणि अँटिमनी वबिस्मथ या दुर्बल धातू आहेत.

संयुजा तीन : या स्तंभात वरून खाली (N ते Bi विद्युत् धनता गुणविशेष वाढत जातो. नायट्रोजन त्याच्या नायट्राइडामध्ये (LiN3) N3_ अशी विद्युत् ऋणता (इलेक्ट्रॉन आकर्षित करून ऋण विद्युत् भार वाढविण्याची प्रवृत्ती) दाखवतो. नायट्रोजनाची १+ते ५+अशा संयुजा त्याच्या ऑक्साइडांवरून दिसून येतात [⟶ नायट्रोजन]. सर्व मूलद्रव्ये तीन सहसंयुजा दाखवितात. P परिकक्षेतील तीन इलेक्ट्रॉनदुसऱ्या तीन इलेक्ट्रॉन देणाऱ्या मूलद्रव्यांशी सहसंयुजी बंध निर्माणकरतात उदा., NH3, PH3 इत्यादी. या बंधामुळे अष्टक तयार होते. गटात वरून खाली या सहसंयुजेचा विद्युत् संयुजेत बदल होतो उदा., As3+, Sb3+ वBi3+. याचे कारण s कक्षेतील दोन इलेक्ट्रॉन निष्किय होतात, असे मानले जाते.

संयुजा पाच : पाच ही सहसंयुजा नायट्रोजनाशिवाय इतर सर्व मूलद्रव्ये दाखवितात. नायट्रोजनाला ls2, 2s2 व 2p3 असेपरिकक्ष आहेत. पाच सहसंयुजेने दुसऱ्या कक्षेत ५ +५ =१० इलेक्ट्रॉन होतील परंतु त्या कक्षेत ८ पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन मावू शकत नाहीत म्हणूननायट्रोजन पाच सहसंयुजा दाखवू शकत नाही.

या गटातील मूलद्रव्यांत भौतिक गुणधर्मांत हळूहळू संक्रमण होते. नायट्रोजन वायुरूप आहे. फॉस्फरस सहजगत्या बाष्पीभूत होणारे मूलद्रव्य आहे. इतर मूलद्रव्ये घनरूप असून त्यांचे वितळबिंदू तसे उच्च आहेत.

या गटातील सर्व मूलद्रव्यांची हायड्राइडे (XH3 X = गटातील कोणतेही मूलद्रव्य) वायुरूप आहेत. त्यांची स्थिरता व क्षारकीय गुणविशेष N ते Bi कमी होत जातात. अमोनिया (NH3) प्रबल क्षारकीय व तसा स्थिर आहे. फॉस्फाइन (PH3) हे दुर्बल क्षारकीय आहे. अर्साइन(AsH3) आणि स्टिबाइन (SbH3) अस्थिर असून त्यांत क्षारकीय गुणधर्म अजिबात नाहीत. बिस्मथाचे अतिशयअस्थिर असे हायड्राइड तयार होते व ते बहुधा अम्‍लीय असावे कारण तेक्षारामध्ये विरघळते.

या गटाची प्रारूपिक (नमुनेदार) ऑक्साइडे म्हणजे R2 O3 R2 व O5 (R = गटातीलकोणतेही मूलद्रव्य) ही होत. या ऑक्साइडांचा अम्‍लीय गुणविशेषनायट्रोजनापासून बिस्मथाकडे कमी होत जातो. नायट्रोजन व फॉस्फरस यांचीऑक्साइडे बरीचशी मिळतीजुळती आहेत. आर्सेनिक, अँटिमनी व बिस्मथ यांचीऑक्साइडे उभयधर्मी आहेत.

यांची हॅलाइडे पाण्याशी निरनिराळ्या तऱ्हेने विक्रिया करतात. नायट्रोजन ट्राय क्लोराइडाचे जलीय विच्छेदन होत नाही. बाकीची जलीय विच्छेद्य आहेत. इतर गटांप्रमाणे याही गटातील नायट्रोजन हा पहिला सदस्य बाकीच्या मूलद्रव्यांहून वेगळा आहे. नायट्रोजन बऱ्याच बाबतींत फॉस्फरसाशी समान आहे. नायट्रोजनाची पंचसंयुजी संयुगे फॉस्फरसाच्या पंचसंयुजी संयुगांपेक्षा कमी स्थिर आहेत.

फॉस्फरस व आर्सेनिक गुणधर्माने निकटवर्ती आहेत. बहुरूपता, क्षपणकारक हायड्राइडे, समान संरचनेची अम्ले व समान विक्रिया याबाबतींतत्यांच्यात पुष्कळ साम्य आहे. आर्सेनिक व अँटिमनी हे त्यांच्या गुणधर्मात वसंयुगांत गटामध्ये सर्वांत अधिक निकटवर्ती आहेत. बिस्मथ ही गटातीलवैशिष्ट्यपूर्ण धातू आहे.


गट ६ अ: [ऑक्सिजन(O), गंधक (S), सिलिनियम (Se), टेल्यूरियम (Te) आणि पोलोनियम (Po)]. यातील पहिल्या चार मूलद्रव्यांना (O, S, Se Te) चाल्कोजेन्स (निसर्गातखनिजे तयार करणारी मूलद्रव्ये) असे म्हणतात. पुष्कळशी धातवीय खनिजेऑक्साइडे किंवा सल्फाइडे आहेत. ऑक्सिजन व गंधक यांमध्ये अघातवीय गुणविशेषतीव्रतेने आहे आणि सिलिनियम व टेल्यूरियम यांमध्ये कमी प्रमाणात आहे.पोलोनियम किरणोत्सर्गी व अल्पजीवी आहे परंतु त्यात धातवीय गुणविशेष ठळकपणेदिसून येतो.

या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत s2 व p4 असे सहा संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजनाने दोन इलेक्ट्रॉन घेतले म्हणजेत्याचे अष्टक पूर्ण होते म्हणून ऑक्सिजनाची संयुजा फक्त दोनच असू शकते.मात्र ती विद्युत् संयुजा किंवा सहसंयुजा असू शकते. घातवीय ऑक्साइडामध्येऑक्सिजन ऋणायन (O2-) म्हणून असतो. पाण्याच्या रेणूमध्ये तो सहसंयुजाबंधी असतो. ऑक्सिजनाला d परिकक्ष नसल्याने फक्त दोन हीच त्याची ऑक्सिडीकरण अवस्था [⟶ ऑक्सिडीभवन] असते.गटातील बाकीच्या मूलद्रव्यांना d परिकक्ष उपलब्धअसल्याने त्यांची संयुजा ४ व ६ असू शकते. गंधकाच्या बाबतीत त्याचे अणूउत्तेजित केले असता इलेक्ट्रॉन d परिकक्षेत जाऊन चार व सहा संयुजेची संयुगेतयार होऊ शकतात.

सल्फर हेक्झॅफ्ल्युओराइड(SF6) यामध्ये त्याची संयुजा सहा आहे.

या मूलद्रव्यांचे वितळबिंदू, उकळबिंदू, घनताइ. भौतिक गुणधर्म क्रमाने बदलत जातात. सर्व मूलद्रव्ये बहुरूपी आहेत. सर्व मूलद्रव्ये हायड्राइडे तयार करतात. त्यात पाणी (H2O) हे विशिष्ट आहे. बाकीच्या हायड्राइडांची स्थिरता O पासून Te कडे कमी होतजाते. गंधक ते टेल्यूरियम हायड्राइडांचा उकळबिंदू वाढत जातो. (H2S उकळबिंदू – ६१° ·८ से. H2Se – ४२° से. व H2Te 0° से.). S, Se व Te या मूलद्रव्यांची ऑक्साइडे आणि सल्फाइडे गुणधर्म व विक्रिया यांबाबत सर्वसाधारणपणे सारखी आहेत.

गंधक, सिलिनियम व टेल्यूरियम यांची नीचतर ऑक्साइडे अम्लीय आहेत. ऑक्साइडांची स्थिरता व अम्लीयता कमी होत जाते. टेल्यूरियम ऑक्साइड व पोलोनियम ऑक्साइड उभयधर्मी आहेत.

सिलिनियम, टेल्यूरियम व पोलोनियम ही जास्त विद्युत् घनता असलेली मूलद्रव्ये जटिल आयन तयार करू शकतात, उदा.,(SeF6)2+, (TeCl6)2+ आणि (PoCl6)2+ या आयनांची साधारणपणे क्षारीय धातू व अमोनिया यांपासून जटिल लवणे तयार होतात. उदा., K2(TeCl6), (NH4)2 (PoCl6).

गट ७ अ: [फ्ल्युओरीन (F), क्लोरीन (Cl), ब्रोमीन (Br), आयोडीन (I) आणि ॲस्टटीन (At)]. या गटातील सर्व मूलद्रव्यांच्या शेवटच्या संयुजा कक्षेत s2 p5 असे सात इलेक्ट्रॉन आहेत. बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेऊन वा एकाइलेक्ट्रॉनाशी सहभाग करून अक्रिय वायूचे अष्टक सर्वात तयार होते. सर्वांचीसंयुजा एक आहे (विद्युत् संयुजी NaCI, CaBr2 व सहसंयुजी HCI, CI2 इ.).फ्ल्युओरिनाचीऑक्सिडीकरण अवस्था फक्त एक आहे कारण फ्ल्युओरीन हे सर्वाधिक विद्युत् ऋणताअसलेले आहे. विद्युत् ऋणता फ्ल्युओरीन ते ॲस्टटीन कमी होत जाते. बाकीच्यामूलद्रव्यांची ऑक्सिडीकरण अवस्था +१, +३, +५ व +७ अशीही असू शकते [⟶ हॅलोजन]. ही सर्व मूलद्रव्ये अधातू असून बहुरूपता दाखवत नाहीत. ॲस्टटीन हे मूलद्रव्य किरणोत्सर्गी आहे.

या गटातील मूलद्रव्यांचे गुणविशेष इतर गटांपेक्षा एकमेकांशी अधिक मिळतेजुळते आहेत. सर्व मूलद्रव्यांचे रेणू द्विआणवीय आहेत. फ्ल्युओरीन व क्लोरीन वायुरूप आहेत. ब्रोमीन द्रवरूप व आयोडीन घनरूप आहे. यांचे वितळबिंदू व उकळबिंदू वाढत्या अणुभाराबरोबर वाढत जातात. फ्ल्युओरिनाच्या रेणूमधील बंधन ऊर्जा कमी असते कारण अणूमध्ये अबंधक इलेक्ट्रॉनांचे प्रतिकर्षण चालू असते. क्लोरीन, ब्रोमीन व आयोडीन यांच्या रेणूत d परिकक्ष, बंध तयार होण्याकरिता उपलब्धहोऊ शकतो व त्यामुळे त्यांच्यात बंधन ऊर्जा जास्त असते. हॅलोजनांचे आयनीकरणवर्चस्‌ अधिक असल्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती त्यांच्यात कमीअसते. सर्व हॅलोजनांचे रेणू रंगीत आहेत. दृश्य प्रकाशाच्या शोषणामुळे हेरंग येतात. फ्ल्युओरीन जांभळ्या रंगाचे शोषण करतो म्हणून त्याचा रंग फिकटपिवळा दिसतो. आयोडीन पिवळ्या रंगाचे शोषण करतो म्हणून त्याचा रंग जांभळादिसतो.

ही सर्व मूलद्रव्ये ऑक्सिडीकारक आहेत. फ्ल्युओरीन हे सर्वांत प्रबल ऑक्सिडीकारक आहे. सर्व मूलद्रव्ये धातू व अधातूंशी विक्रिया करतात. फ्ल्युओरीन हे अतिशय विक्रियाशील आहे. विक्रियाशीलता वाढत्या अणुभाराबरोबर कमी होत जाते. फ्ल्युओरिनाची अतिविक्रियाशीलता त्याच्या बंधाची उर्जा कमी असल्यामुळे आहे. विक्रियाशीलता हॅलोजनांच्या पाण्याशी होणाऱ्या विक्रियेवरून स्पष्ट होते.फ्ल्यूओरिन थंड पाण्याचे अपघटन सूर्यप्रकाशामध्ये व सावकाश होते.आयोडिनाची पाण्याशीविक्रिया होत नाही.


या गटातील सर्व मूलद्रव्यांची हायड्रोजन हॅलाइडे (HX) अम्ले आहेत.त्यांचे पाण्याबरोबर आयनीकरण होते (H+,X). यांची लवणे तयार होतात. आयनीकरण हायड्रोफ्लुओरिक अम्लापासून (HF) हायड्रिआयोडिक अम्लांकडे(HI) वाढत जाते.हायड्रोजन-हॅलोजन यांमधील बंधनऊर्जा HF पासून HI कडे कमी होत जाते. धातविय हॅलाइडे ही बहुधा आयनीअसतात. एखाद्या धातूची क्लोराइडे, ब्रोमाइडे व आयोडाइडे बहुधा एक सारखीअसतात परंतु त्याच धातूची फ्ल्युओराइडे क्वचित असंगत असू शकतात. उदा.,AgF हे पाण्यात विद्राव्य आहे परंतु इतर सिल्व्हर हॅलाइडे अविद्राव्यआहेत. उलट CaF2 हे अविद्राव्य, तर कॅल्शियम हॅलाइडे(CaCI2, CaBr2 इ.) विद्राव्य आहेत. हॅलोजनांची ऑक्साइडे तयार होतात. ती अम्लधर्मी असून त्यांची पाण्याबरोबर अम्ले तयार होतात. F2O या फ्ल्यूओरिन ऑक्साइडाला ऑक्सिजन फ्ल्युओराइड असे म्हणतात कारणफ्ल्युओरिन ऑक्सिजनापेक्षा जास्त विद्युत्‌ ऋण आहे व सूत्र लिहितानाविद्युत्‌ ऋण मूलद्रव्य शेवटी लिहितात म्हणून फ्ल्युओरिन ऑक्साइड OF2 असे लिहितात.

ऑक्सिअम्लांमध्ये क्लोरिनाची ऑक्सिअम्ले महत्त्वाची आहेत [⟶ क्लोरिन]. त्यांची ऑक्सिडीकारकता ऑक्सिजन अणूंच्या वाढत्या संख्येबरोबर कमी होत जाते.

गट ० (शून्य) किंवा अभिजात वा अक्रिय वायू गट : [ हीलियम (He), निऑन (Ne), आर्‍गॉन (Ar), क्रिप्टॉन (Kr), झेनॉन (Xe) आणि रेडॉन (Rn)].या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत s2p6 असे आठ इलेक्ट्रॉन असतात.मात्र होलियमात फक्त s2 दोनचइलेक्ट्रॉन असतात. हिलियमाचे दोन इलेक्ट्रॉन त्याची कक्षा पूर्ण करतात. इतरांचे शेवटच्या कक्षेतील अष्टक पूर्ण झालेले असते. ही मूलद्रव्येदुसऱ्या मूलद्रव्यांना इलेक्ट्रॉन देत नाहीत व दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेतनाहीत किंवा दुसऱ्या इलेक्ट्रॉनाशी सहभागीही होत नाहीत. म्हणूनच यामूलद्रव्यांना ⇨ अक्रिय वायु किंवा अभिजात वायू असे म्हणतात.इलेक्ट्रॉनांचा विनिमय होत नसल्यामुळे यांची संयुजा शून्य आहे. म्हणून यांना शून्य गटातील मूलद्रव्ये म्हणतात.मेंडेलेव्ह यांच्या आवर्त सारणीत त्यांना डावीकडे प्रथम स्थान दिले गेले होते म्हणजे संयुजेप्रमाणे ०, १, २, ३ असे गट ओळीने येतात परंतू इलेक्ट्रॉन विन्यास अभ्यासाने असेदिसून आले की, ही मूलद्रव्ये p वर्गातील मूलद्रव्ये आहेत व ती बोर-टॉम्पसनसारणीत उजव्या टोकास मांडली जातात.

या मूलद्रव्यांच्या अणूंची इलेक्ट्रॉन आसक्ती शून्य आहे त्यांचे आयनीकरण वर्चस् इतर कुठल्याही मूलद्रव्यांपेक्षा अधिक आहे.त्यामुळे ही मूलद्रव्ये एकआणवीय आहेत.हीलियम हे मूलद्रव्य अनन्य आहे.याचे घनीभवन दाबाखाली शक्य होते. याच्या दोन द्रवरूप स्थिती आहेत [⟶ हिलियम]. अलिकडे या मूलद्रव्यांची काही संयुगे बनविण्यात आली आहेत.

d वर्ग मूलद्रव्ये अथवा संक्रमणी मूलद्रव्ये :आवर्ती वर्गीकरणानुसार आतापर्यंत गट क्रमानूसार चर्चिलेलीमूलद्रव्येअ गट किंवा प्रातिनिधिक कुलातील मूलद्रव्ये होत.या s व p वर्गात मोडणाऱ्या मूलद्रव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे मूलद्रव्यात गटक्रमानुसार शेवटच्या परिकक्षेत एका संयुजी इलेक्ट्रॉनाची भर होऊन १ अ ते ७ अगट तयार झालेले आहेत. यांतील उभ्या गटातील मूलद्रव्ये संयुजा, भौतिक वरासायनिक गुणधर्म या बाबतींत एकमेकांशी मिळतीजुळती आहेत. d वर्ग हा s व p या दोन वर्गांच्या मध्ये आहे [⟶ आवर्त सारणी].

या d वर्गातील मूलद्रव्यांना ‘संक्रमणी’ मूलद्रव्ये म्हणतात. संक्रमणीमूलद्रव्यांत इलेक्ट्रॉनांचे समावेशन आतल्या कक्षांमध्ये होते. हे समावेशनकाही मूलद्रव्यात उपांत्य कक्षेत व काहींच्या उपउपांत्य कक्षेत होते [⟶ अणु व आणवीय संरचना संक्रमणी मूलद्रव्ये].

ही सर्व मूलद्रव्ये धातू असून ती गट २ अ मधील धातूंप्रमाणे आहेत. संक्रमणीमूलद्रव्यांत काही संरचनात्मक दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवान वमिश्रधातू तयार करणारी अशी मूलद्रव्ये आहेत. त्यांचे आयन रंगीत असतात.

गट ३ ब: [स्कँडियम(Sc), इट्रियम (Y), लँथॅनम (La) आणि ॲक्टिनियम (Ac)]. या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत d1s2 असे तीन इलेक्ट्रॉन आहेत. यांची ऑक्सिडीकरण अवस्था तीन आहे. या मूलद्रव्यांचा काही वेळा ⇨ विरल मृत्तिका मूलद्रव्य गटात समावेश करतात. तथापि ही मूलद्रव्ये d वर्गातील असून विरल मृत्तिका f वर्गातील मूलद्रव्ये आहेत आवर्त सारणीतलँथॅनमाच्या जागेत सर्व विरल मृत्तिका मूलद्रव्ये एकत्र घातली जातात.

दोन s व एक d मिळून तीन इलेक्ट्रॉन निघून गेल्यावर मागे पूर्ण भरलेली कक्षा रहातअसल्यामुळे यांची संयुगे रंगहीन व प्रतिचुंबकीय आहेत. या धातू क्रियाशीलअसून त्यांचे वितळबिंदू उच्च आहेत. गट २ अ मधील धातूंप्रमाणे या धातूपाण्याशी विक्रिया करतात आणि त्यातून हायड्रोजन निघतो व त्यांचीहायड्रॉक्साइडे तयार होतात. स्कँडियम हायड्रॉक्साइड [Sc(OH)3] हे कॅल्शियम हायड्रॉक्साइडापेक्षा कमी क्षारकीय आहे व ॲल्युमिनियमहायड्रॉक्साइड या उभयधर्मी हायड्रॉक्साइडापेक्षा जास्त क्षारकीय आहे. हीक्षारकता गटामध्ये वाढत्या अणुभाराबरोबर वाढत जाते. या गटातील धातवीय आयनसाधारणपणे मोठे असल्याने यांची जटिल लवणे फारशी होत नाहीत. स्कँडियम आयनसर्वांत लहान असल्याने त्याची काही जटिल लवणे तयार होतात.

ॲक्टिनियम हे नेहमी युरेनियम व थोरियम यांच्याबरोबर संबंधित असल्याचेआढळते. त्याचे निसर्गात दोन समस्थानिक आढळतात व दोन्ही किरणोत्सर्गी आहेत.त्यांचे अर्धायुकाल २२ वर्षे व ६ तास असे आहेत.


गट ४ ब: [टिटॅनियम (Ti), झिर्कोनियम (Zr), हाफ्नियम (HF) आणि थोरियम (Th)]. या मूलद्रव्यांच्या संयुजी इलेक्ट्रॉनांचा विन्यास d2 s2 असा आहे. यातील थोरियम‘f’ वर्गात आहे. या मूलद्रव्यांत एकमेकांत साधर्म्य दिसून येते. विशेषतःझिर्कोनियम व हाफ्नियम यांचे रासायनिक गुणधर्म जवळजवळ एकरूप आहेत. याचेकारण लँथॅनाइड संकोचनामुळे [⟶ संक्रमणी मूलद्रव्ये] दोहोंच्या अणूंचे व आयनांची आकारमाने सारखी आहेत. या सर्वांत टिटॅनियम हेमहत्त्वाचे आहे. ते वजनाने हलके व क्षरण प्रतिरोधी (झीज होण्यास रोधकरणारे) असल्याने त्याचा फार उपयोग होतो.

या सर्व धातू दुर्बल धातू आहेत हे टिटॅनेटे यांसारख्या संयुगांवरून दिसून येते.त्यांचा अँटिमनी , बिस्मथ यांच्यासारखी क्षारीय लवणे तयार करण्याकडे विशेष कल आहे. यांचीमुख्य संयुजा चार आहे. काहींची २ व ३ या संयुजेचीसंयुगेही तयार होतात.चार संयुजेची संयुगे स्थिर आहेत. टिटॅनियम ट्रायक्लोराइड (TiCl3) हे प्रबळ क्षपणकारक आहे. ते घनफळात्मक विश्लेषणात वापरतात, तसेच कार्बनी रसायनवशास्त्रात क्षपणकारक म्हणून वापरतात.

टिटॅनियमाची TiOव Ti2O3 ही ऑक्साइडे क्षारकीय आहेत. TiO2, ZrO2 व HfO2 ही ऑक्साइडे उभयधर्मी आहेत. थोरियम ऑक्साइड ( ThO2) हे क्षारकीय आहे. यांची जटील लवणे तयार होतात. आयनीकरण वर्चस् उच्च असल्याने बहुशः सहसंयुजी संयुगे तयार करण्याकडेयांचा कल असतो.

गट ५ :ब [व्हॅनेडियम (V), निओबियम (Nb), टँटॅलम (Ta) आणि प्रोटॅक्टिनियम (Pa)]. या मूलद्रव्याच्या संयुजी इलेक्टॉनांचा विन्सास d3s2 असा आहे. प्रोटॅक्टिनियम ‘ f ’ वर्गात येते. ही मूलद्रव्ये विशेषशीक्रियाशील नाहीत. शिवाय त्यांच्या पृष्ठभागावर संरक्षक असा ऑक्साइडाचा पातळथर तयार होतो.   त्यामुळेही अक्रियता दिसून येते. ही मूलद्रव्ये दुर्बलधातू आहेत. त्यांची उमयधर्मी ऑक्साइडे तयार होतात. त्यांचा क्षारकीय संयुगेतयार करण्याकडे कल आहे. अशा तऱ्हेचासारखेपणा ३ ब, ४ ब आणि ६ ब यांतीलमूलद्रव्यांशी दिसून येतो.

या मूलद्रव्यांची मुख्य ऑक्सिडीकरण अवस्था ५ आहे. तथापि त्यांच्या ऑक्सिडीकरण अवस्थांची व्याप्ती बरीच आहे.-१ पासून +५पर्यत ती असू शकते. कमी संयुजा असलेली आयनी संयुगे रंगीत असतात कारणत्यांत इलेक्ट्रॉनांचे अपूर्ण परिकक्ष असतात आणि त्यांत प्रकाश शोषण होतअसते. उदा., पंचसंयुजी व्हॅनेडियम संयुगे जर जस्ताने व अम्लाने क्षपण करूनकमी संयुजेची संयुगे मिळविली, तर रंगीत संयुगे मिळतात. ज्यांचे इलेक्ट्रॉनकक्ष पूर्ण असतात ती संयुगे रंगहीन असतात. व्हॅनेडियम संयुगांचे रंग असे :

V5+ V4+ 3+ V2+
रंगहीन निळा हिरवा जांभळा

या क्षपणाने Nb5+ पासून Nb3+ मिळते परंतु Ta5+ चे क्षपण होत नाही. कमी संयुजेची संयुगे V पासून→ Nb→ Ta → Pa या क्रमाने कमी स्थिर व तयार करण्यास कठीण असतात. V2+ संयुगे आयनी, क्षपणकारक व क्षारकीय आहेत व ती Fe2+ सारखी आहेत आणि V3+ आयन Fc3+ आयनासारखे आहेत.

लँथॅनाइड संकोचनामुळे Nb व Ta यांच्या आयनी व सहसंयुजी त्रिज्या सारख्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातअभिन्नरूप साम्य आहे. त्या निसर्गात एकत्र आढळतात व एकमेकींपासून अलग करणेकठीण जाते.

या सर्व धातू सामान्य तापमानाला अक्रिय आहेत परंतु उच्च तापमानाला विक्रियाशील बनतात. निओबियम व टँटॅलम यांच्यावरहॅलोजनांची विक्रिया होऊन पेंटॅहॅलाइडे मिळतात. व्हॅनेडियमाची VF5, VCl4,VBr3, VI3 अशीहॅलाइडे तयार होतात. या धातूंची अपरिमाणात्मक (केवळ डाल्टन नियमांनुसार वाइलेक्ट्रॉनीय विवरणानुसार भाकीत केलेल्याच यथार्थ संघटनाप्रमाणे ज्यांचेसंघटन नाही अशी) हायड्राइडे तयार होतात. या धातूंची ऑक्सिजनाशी विक्रियाहोऊन पेंटॉक्साइडे मिळतात. व्हॅनेडियमाची VO (क्षारकीय व संयुजा 2+),V2 O3 क्षारकीय, सं. 3+), VO2 उभयधर्मी, सं.4+)व V2 O5) (उभयधर्मी, सं.5+) अशी ऑक्साइडे होतात. VO हे अपरिमाणात्मक आहे. त्याचे संघटन VOo.94-1·12 असे मांडता येईल. या धातू जटिल लवणे तयार करतात, उदा.,K4[V(CN)6].

गट ६ ब: [क्रोमियम Cr), मॉलिब्डेनम (Mo), टंगस्टन (W) आणि युरेनियम(U)].यातीलयुरेनियमट ‘f’ वर्गातील आहे. संक्रमणी मूलद्रव्यांतील हा एक निकटसंबंधी गटआहे. सापेक्षेतेने सर्वांची विक्रियाशीलता कमी आहे.सर्व दुर्बल धातूआहेत.ही मूलद्रव्ये अनु क्रमे क्रोमेट, मॉलिब्डेटे व टंगस्टेटे अशीसंयुगे तयार करतात. लँथॅनाइड सं कोचनामुळे मॉलिब्डेनम व टंगस्टन यांच्या अणूव आयन त्रिज्या सारख्या असल्याने त्यांचे गुणधर्म सारखे आहेत.विक्रियाशीलता वाढत्या अणुक्रमांकाने कमी होत जाते.ही मूलद्रव्येबहुसंयुजी आहेत.

त्यांची कार्बोनिले तयार होतात यावरून त्यांची शून्य ऑक्सिडिकरण अवस्था दिसून येते. Cr(CO)6, Mo(CO)6 W(CO)6 अशा तयार होणाऱ्या कार्बोनिलांमध्येकार्बोनिल गटातील (CO) इलेक्ट्रॉनामुळे हे बंध तयार होतात.कमी दाबाखाली त्यांचे संप्लवन (घनअवस्थेतून सरळ वायुरूप अवस्थेत जाण्याची क्रिया) होते व ती कार्बनr विद्रावकात विद्राव्य आहेत.कार्बोनिले तापवल्यास त्यांचे अपघटन होऊनशुद्ध धातू मिळतात.


Cr3+ ही संयुगे सर्वाधिक स्थिर आहेत.संयुगांचे क्षारकीय गुणधर्म वाढत्या ऑक्सिडिकरण क्रमांकाबरोबर [⟶ ऑक्सिडिकरण] कमी होत जातात, असे त्यांच्या ऑक्साइडावरून दिसून येते.

ऑक्साइडे CrO MoO2 WO2
क्षारीय अम्ल व क्षार यांमध्ये अविद्राव्य अविद्राव्य
Cr2O2 Mo2O5 W2O5
उभयधर्मी क्षारीय
CrO3 MoO3 WO3
अम्लिय अम्लिय अम्लिय

क्रोमियम गटात शेवटच्या कक्षेत सहा इलेक्ट्रॉन असल्यामुळे या गटाचे काही गुणधर्म उच्च ऑक्सिडिकारक अवस्थेत ६ अ गटाप्रमाणे आहेत. उदा.,  CrO42-, SO42- आणि SeO42- यांच्यासंरचना चतुष्फलकी आहेत. क्षारीय धातूंची टंगस्टेटे हयड्रोजन किंवाटंगस्टन याबरोबर तापविली असता त्यांचे क्षपण होऊन निळ्या, जांभळ्या, तांबड्या व पिवळ्या रंगांचे काशांचे (ब्राँझांचे) प्रकार तयार होतात. त्यांचे रासायनिक सूत्र MxWO3 असे मांडता येइल. यातM म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम व x याचे मूल्य नेहमी एकापेक्षा कमी असते. ही विद्युत् संवाहक असतात.

क्रोमियमाची हेक्झॅहॅलाइडे होत नाहीत. इतरांची MoF6. WX6 (X = F, CI, Br), UF6 व UCI6 अशी हॅलाइडे मिळतात. ही सर्व हॅलाइडे बाष्पनशील आहेत. नैसर्गिक युरेनियमामधील U235 व U238 यांपासून मिळणाऱ्या UF6 या संयुगांची विसरण गती (रेणूंच्या उत्स्फूर्त हालचालीची व विखुरण्याची गती) वेगवेगळी असल्याने भंजनक्षम U235 मूलद्रव्य अणुबाँबकरिता अलग करणे शक्य होते.

ऑक्सिहॅलाइडांमध्ये क्रोमील क्लोराइड (CrO2 CI2) व मॉलिब्डेनिल क्लोराइड (MoO2 CI2 ) सहसंयुजी असून त्यांचे त्वरित जलीय विच्छेदन होते. टंगस्टेनिल क्लोराइडाचे जलीय विच्छेदन सावकाश होते. युरेनिल क्लोराइड (UO2 +CI2) हे आयनी संयुग आहे. युरेनियमाची असिटेट व नायट्रेट ही संयुगे आयनी आहेत. (CrO2 CI2) हो गडद तांबड्या रंगाचे असून हा रंग येणे ही कसोटी क्लोराइड आयनाचे अभिज्ञान करण्यासाठी (अस्तित्व ओळखण्यासाठी) वापरतात. युरेनिल ॲसिटेटापासून स्फटिकी सोडियम युरेनिल असिटेट Na+[UO2(Ac)3] मिळते व ही कसोटी सोडियम आयनाचे अभिज्ञान करण्यासाठी वापरतात.

क्रोमियम व याच गटातील इतर मुलद्रव्ये यांमध्ये फरक आहे. क्रोमियमाची ३+ ही ऑक्सिडीकरण अवस्था महत्त्वाची आहे. क्रोमियमाचे हिरव्या रंगाचे क्रोमियम सेस्क्‌वी ऑक्साइड ( Cr2O3 ) अमोनियम डायक्रोमेटाचे ऊष्मीय अपघटन करून मिळवतात.

(NH4 )2 Cr2O7 → N2 + 4H2O + Cr­2O3CrCl3·6H2O या सूत्राचे तीन सजल समघटक (समान घटक मूलद्रव्ये व त्यांची प्रमाणे असलेले पण भिन्न संरचना असलेले पदार्थ) आहेत.

[Cr(H2 O)6]CI3 जांभळा रंग, तीन क्लोरीन आयन.[Cr(H2 O)5 CI].CI2· H2O फिकट हिरवा रंग, दोन क्लोरीन आयन. [Cr(H2O)4 CI2]CI·2H2O गडद हिरवा रंग, एक क्लोरीन आयन. क्रोमियम दुहेरी लवणे तयार करते. उदा., क्रोम तुरटी (ॲलम). या गटातील मूलद्रव्ये जटिल लवणे तयार करतात उदा., [Cr(NH3)6]3+, [CrCI6]3- इत्यादी. या मूलद्रव्यांचा अणुक्रमांक सम आहे.

गट ७ ब : [मँगॅनीज (Mn), टेक्नेशियम (Tc) व ऱ्हीनियम (Re)]. निसर्गात मँगॅनीज हे ऱ्हीनियमापेक्षा जास्त प्रमाणात आढळते. टेक्नेशियम निसर्गात अजिबात आढळत नाही. ते फक्त किरणोत्सर्गी विक्रियांत तयार होते.

42Mo98 +ON1 42Mo99 43Tc99  + β

ऱ्हीनियम हे निसर्गात अत्यल्प आढळते. तिन्ही मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म जवळजवळ सारखे आहेत. मँगॅनीज थोडे वेगळे आहे.

मँगनीज हे आडव्या रांगेत क्रोमियम व लोह यांच्या मधे आहे. मँगॅनिजाचे काही रासायनिक गुणधर्म क्रोमियमासारखे तर काही गुणधर्म लोहासारखे आहेत. उदा., Cr2O3 व Mn2O3 या ऑक्साइडांची अम्लाशी विक्रिया केल्यास CR3+, Mn3+ लवणे तयार होतात. मात्र Mn3+ लवणे अस्थिर आहेत. क्षारांबरोबर क्रोमाइटे व मँगॅनाइटे तयार होतात. MnO3 वCrO3 ही ऑक्साइडे अम्‍लीय असून त्यांपासून अनुक्रमे मँगॅनेटे व क्रोमेटे तयार होतात. हिरव्या रंगाची मँगॅनेटे व पिवळ्या रंगाची क्रोमेटे ही समरूपी (भिन्न रासायनिक संघटन असलेली पण समान संरचना असलेली) आहेत. MnO हे ऑक्साइड लोहाच्या FeO या ऑक्साइडाशी समान आहे. दोन्हीपासून Mn2+ व Fe2+ अशी लवणे तयार होतात.Mn2O3 हे Fe2O3 प्रमाणे व Mn3O4 हेFe3o4 सारखे आहे. ही दोन्ही ऑक्साइडे मिश्र ऑक्साइडे आहेत (FeO+Fe2O3 व MnO+Mn2O3). इलेक्ट्रॉन विन्यासाप्रमाणे या मूलद्रव्यांची ऑक्सिडीकरण अवस्था सात आहे परंतु ही मूलद्रव्ये बहुसंयुजी आहेत. मँगॅनिजाची MnO (क्षारीय), Mn2O3 (उभयधर्मी), Mn3O4 (मिश्र), MnO2(उभयधर्मी), MnO3 व Mn2O7 (दोन्ही अम्‍लीय) अशी निरनिराळ्या संयुजांची ऑक्साइडे तयार होतात. ऱ्हीनियमाची ReO2,ReO3 व Re2O7 ही सर्व ऑक्साइडे अम्‍लीय आहेत.

नायट्रोजन, कार्बन, पाणी, दुर्बल व प्रबल अम्ले यांची मँगॅनिजावर विक्रिया होते, ऱ्हीनियमावर विक्रिया होत नाही, फक्त प्रबल अम्लामध्ये ते सावकाश विरघळते. हॅलोजेने, गंधक व ऑक्सिजन यांची दोहोंवरही विक्रिया होते. यांची [Mn2(CO)10], [Re(CO)1o] अशी कार्बोनिले होतात. ही मूलद्रव्ये जटिल लवणे तयार करतात, उदा., K6[Mn(CN)6].2 NH3, [MnCI4]इ. मँगॅनिजाची लवणे रंगीत आहेत. Mn2+ ही गुलाबी रंगाची व Mn7+(KMnO4) या संयुजेची दाट जांभळ्या रंगाची आहेत. [Mn (Oxalate)3]3- हे उष्णतेला अस्थिर आहे. त्याचे ६० से.ला अपघटन होते म्हणून परमँगॅनेट/ऑक्झॅलेट अनुमापन [⟶ अनुमापन] तापवलेल्या पाण्यात अनुमापन चंबू धरून करतात. पोटॅशियम परमँगॅनेट (KMnO4) हे महत्त्वाचे ऑक्सिडीकारक संयुग आहे.


गट ८ वा : लोह व प्लॅटिनम त्रयी: या गटात तीन आडव्या त्रया आहेत. पहिलीला लोह गट आणि दुसरी व तिसरीला मिळूनप्लॅटिनम गटातील मूलद्रव्ये असे मानले जाते. या गटातील उभ्या स्तंभाऐवजीआडव्या रांगेतील मूलद्रव्यांची तुलना करणे त्यांच्या गुणधर्माप्रमाणे योग्यहोईल.

लोह त्रयी: [लोह (Fe), कोबाल्ट (Co) व निकेल (Ni)]. ही मूलद्रव्ये चांदीसारखी पांढरी, निसर्गात सर्वत्र आढळणारी, लोहचुंबकीय आणि प्लॅटिनम गटातीलमूलद्रव्यांपेक्षा अधिक क्रियाशील आहेत.अपूर्ण d परिकक्षेतीलइलेक्ट्रॉनांच्या परिवलन गतीमुळे लोहचुंबकत्व निर्माण होते, अशी मीमांसामांडण्यात आलेली आहे.लोह व प्लॅटिनम या दोन्ही गटांतील मूलद्रव्यांतवायूंचे पृष्ठशोषण करण्याचा गुणधर्म आढळून येतो. यांचा वायूविक्रियांमध्ये उत्प्रेरक (विक्रियेची गती बदलण्यासाठी वापरण्यात येणारा वस्वतः विक्रियेत भाग न घेणारा पदार्थ) म्हणून उपयोग होतो.क्रियाशीलता Fe ते Ni कमी होत जाते.

या मूलद्रव्यांच्या संयुजा २, ३, ४ व ६ अशा असल्या, तरी २ व ३ या संयुजा विशेष आढळतात.४ व ६ संयुजांचीकाही जटिल संयुजे तयार होतात.२ ही विद्युत् संयुजा तिन्ही मूलद्रव्येदाखवितात. Co व Ni या मूलद्रव्यांची २ ही स्थिर सयुजा आहे. लोहाची ३ ही संयुजा स्थिर आहे. द्विसंयुजी संयुगांतया मूलद्रव्यांचे Cr, Mn व Cu, Zn यांच्याशी साम्य आढळते. FeO, CoO व NiO (सर्व क्षारीय), Fe2O3 (उभयधर्मी), Co2O3 व Ni2O3(सजल), Fe3O4 व Co3O4 (मिश्र) व NiO2 (क्षारीयव सजल) अशी या मूलद्रव्यांची ऑक्सइडे होतात. यांची ऑक्सइडेआवर्त सारणीतील डाव्या बाजूच्या Cu व Zn यांच्याऑक्सइडांसारखी आहेत.यांची लवणे Fe2+ (हिरवा रंग), Co2+ (फिकट तांबडा रंग) व Ni2+(हिरवारंग), क्रोमियम, मँगॅनिज, तांबे व जस्त यांच्या लवणांप्रमाणे आहेत.त्रिसंयुजेचा कल Fe ते Ni कमी होत जातो.निकेलाची सर्व साधी संयुगेद्विसंयुजी आहेत.

या मूलद्रव्यांची आयनी त्रिज्या Fe ते Ni कमी होत जाते त्यामुळे जटिल लवणे तयार होण्याची क्षमता वाढत जाते. [Fe(CN)6], [Co(NH3)6]2+, अशा तऱ्हेचे जटिल आयन तयार होतात.रक्तातील तांबड्या पेशींमधील हीमोग्लोबिन (Fe), ब१२जीवनसत्व (Co), प्रशियन ब्ल्यू KFe[Fe(CN)6], सोडियम नायट्रोप्रुसाइड (ताबडा रंग) Na2 [Fe(CN)5 NO] 2H2O इ. संयुगे महत्वाची आहेत.

प्लॅटिनम गट: [रूथेनियम (Ru), ऱ्होडियम (Rh) आणि पॅलॅडियम (Pd) ऑस्मियम (Os), इरिडियम (Ir) आणि प्लॅटिनम (Pt)].या मूलद्रव्यांची क्रियाशीलता Ru ते Pd व Os ते Pt वाढत जाते. या धातू अक्रिय असल्याने निसर्गात थोड्याफार प्रमाणातधातूरूपात आढळतात. त्यांचे चांदी व सोने यांच्याशी साम्य आहे.या गटातीलमूलद्रव्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अगदी एकसारखे आहेत. पॅलॅडियमधातूशिवाय इतर सर्व धातू हायड्रोक्लोरिक, नायट्रिट व सल्फ्यूरिक या अम्लांतअविद्राव्य आहेत.Pd, Os व Pt अम्लराजात विद्राव्य आहेत परंतु Ru, Rh व Ir अम्लराजात देखील विद्राव्य नाहीत.ही मुलद्रव्ये लोह गटातीलमूलद्रव्यांप्रमाणे लोहचुंबकिय नाहीत मात्र वायुशोषण प्रबलपणे करतात.त्यामुळे Pd व Pt वायूंच्या विक्रियांत उत्तम उत्प्रेरक म्हणून उपयोगीपडतात.

लँथॅनाइड संकोचनामुळे दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तातील संक्रमणी मूलद्रव्ये समान आहेत. त्यांच्या अणूंचे आकारमान सारखे असल्यामुळे Os, Ir व Pt यांची घनता Ru, Rh व Pd यांच्या जवळजवळ दुप्पट आहे. ही सर्व मूलद्रव्ये निसर्गात अत्यंत कमी प्रमाणात आढळतात.

या मूलद्रव्यांशी हॅलोजने उच्च तापमानाला विक्रिया करून हेक्झॅहॅलाइडे तयार करतात. उदा.,OsF6, IrF6, PtF6 इत्यादी.लोह व प्लॅटिनम गटांतील मूलद्रव्ये वैशिष्ट्यपूर्ण संक्रमणी मूलद्रव्ये आहेत.त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे बदलती संयुजा, रंगीत संयुगे, उत्प्रेरक गुणधर्म व जटिल संयुगे तयार करण्याची क्षमता हीहोत. प्लॅटिनम गटातील मूलद्रव्यांची उच्च ऑक्सिडीकरण अवस्थांतील संयुगेस्थिर आहेत, साध्या आयनी अवस्थेचा अभाव आहे व ही मूलद्रव्ये लोह गटापेक्षाजास्त अभिजात आहेत.

गट १ ब : [तांबे (Cu),चांदी (Ag) आणि सोने(Au)]. या मूलद्रव्यांच्या अणूमध्येबाह्यकक्षेत गट १ अ प्रमाणे एक s इलेक्ट्रॉन आहे. अ गटात उपांत्य कक्षेतइलेक्ट्रॉनांचे अष्टक पूर्ण आहे व ब गटाच्या उपांत्य कक्षेत १० dइलेक्ट्रॉन असून s2, p6 वd10 मिळून १८ इलेक्ट्रॉन आहेत. गट १ अ मधील धातू ⇨ विद्युत् रासायनिक श्रेणीत (धातू व इतर पदार्थ त्यांच्य रासायनिक विक्रियाशीलतेप्रमाणे क्रमवार लावलेले आहेत अशा श्रेणीत अधिक विक्रियाशील वरच्या क्रमांकावर व कमी विक्रियाशील खालच्याक्रमांकावर) वरच्या क्रमांकाला आहेत व गट १ ब गटातील धातू शेवटी आहेत. हीमूलद्रव्ये ऑक्सिडीकारक नसलेल्या अम्लातून हायड्रोजन विस्थापित करू शकतनाहीत. या मूलद्रव्यांना अभिजात मूलद्रव्ये किंवा चलनी मूलद्रव्ये म्हणतात.अभिजातता Cu ⟶ Ag ⟶ Au अशी वाढत जाते. विद्युत् घनता गुणविशेष कमी होत जातो. सोने हे सापक्षेतःअक्रिय आहे. त्याचे प्लॅटिनम गटातील धातूंशी बऱ्याच बाबतींत साम्य आहे.

गट १ अ ची ऑक्साइडे व हायड्रॉक्साइडे प्रबल क्षारीय व पाण्यात विद्राव्य आहेत तांबे गटाची क्षीण क्षारीय व अविद्राव्य आहेत. सोडियम गटाची लवणे एकसंयुजीव रंगहीन आहेत. त्यांची जटिल लवणे प्रबल जटिल विक्रियाकारक वापरले तरचहोतात. तांबे गटाची मूलद्रव्ये बदलत्या संयुजेची, रंगीत व जटिल लवणे तयारकरण्याकडे कल असलेली अशी आहेत.

तांबे गटातील मूलद्रव्यांची संयुजा १, २ व ३ अशी आढळते परंतु स्थिर संयुगे Cu2+, Ag1+ व Au3+ या संयुजांची आहेत. क्युप्रस आयन (Cu+) हा अस्थिर आहे. क्युप्रिक (Cu2+) संयुगे स्थिर आहेत. आर्जेटस आयन (Ag+)हा स्थिर आहे. ऑयरस आयन (Au+) हा अस्थिर असून त्याचे त्वरित ऑयरिक आयनामध्ये (Au3+) रूपांतर होते. Cu+ व Au+ आयन त्यांच्या अविद्राव्य संयुगांत स्थिर असतात उदा., Cu2 CI2, Au2S. एक संयुजेची स्थिरता जटिल लवणामुळे असू शकते. उदा.,

Cu+ + 3CN- ⟶[Cu(CN)3]2-

Au+ + 2CN [Au(CN)2]


द्विसंयुजा तयार होण्यात d इलेक्ट्रॉनांपैकी एक इलेक्ट्रॉन लागतो.चांदीची द्विसंयुजेची संयुगे बनत नाहीत.  अपवादात्मक दोन संयुगे द्विसंयुजेची आहेत एक AgF2 व दुसरे AgO.काही जटिल लवणांत द्विसंयुजा स्थिर झालेली आढळते. या गटाची ऑक्साइडे क्षारीय आहेत. फक्त सोन्याचे Au2O3 हे ऑक्साइड उभयधर्मी आहे. सोने व चांदी यांची ऑक्साइडे तापवल्यास धातूमिळतात. सोन्याची द्विसंयुजेची संयुगे तयार होत नाहीत. तांब्याची मात्रसामान्यतः द्विसंयुजेची स्थिर संयुगे तयार होतात. क्युप्रिक लवणेसामान्यपणे निळ्या रंगाची असतात. निर्जल क्युप्रिक सल्फेट (CuSO4) हे रंगहीन असते.CuSO5H2O निळ्या रंगाचे असते कारण त्यात [Cu(H2O)4]2+ हा जटिल आयन तयार होतो. तांब्याचे महत्त्वाचे जटिल लवण क्युप्राअमोनियम सल्फेट [Cu(NH3)4]SO4 याचा ⇨ कृत्रिम तंतू तयार करण्याकरिता उपयोग होतो. त्रिसंयुजी अवस्था सोन्याच्या बाबतीत दिसून येते. त्याचे AuF3 हे संयुग आयनी आहे. बाकीची ऑयरिक संयुगे बहुधा सहसंयुजी आढळतात. सोन्याची बहुसंख्य जटिल लवणे ज्ञात आहेत.

गट २ ब : [जस्त (Zn), कॅडमियम (Cd) आणि पारा (Hg)].या गटातील मूलद्रव्ये इतरसंक्रमणी मूलद्रव्यांपासून बऱ्याच बाबतींत वेगळी आहेत.गट १ ब प्रमाणेयाही गटातील उपांत्य कक्षा (d)  १८ इलेक्ट्रॉनांनी पूर्ण भरलेली आहे वशेवटच्या ‘s’ कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत. यांची द्विसंयुजी संयुगे तयारहोतात कारण d परिकक्षेतील इलेक्ट्रॉन संयुजेसाठी उपलब्ध होत नाही. दोनऑक्सिडीकरण अवस्था हे या गटाचे वैशिष्ट्य आहे. पारा Hg1+ संयुगे तयार करतो परंतु ती द्विवारिकी (दोन रेणू एकत्र येऊन तयार होणारी) आहेत. उदा., मर्क्युरसक्लोराइड (Hg2 CI2) हे संयुग CI-Hg-Hg-CI असे आहे. त्यामुळे Hg1+आयन अस्थित्वात नाही. पाऱ्याच्या दोन अणूंमधील सहसंयुजी बंधामुळे मर्क्युरस आयन Hg22+ असा दर्शवितात.

इतर संक्रमणी मूलद्रव्यांप्रमाणे ही मूलद्रव्ये घावतीय आहेत परंतु ती बदलती संयुजा दाखवत नाहीत व त्यांची संयुगे रंगहीन आहेत.आयनीकरण वर्चसावरून तांबे गट जास्त विक्रियाशील वाटतो परंतु प्रत्यक्षातजस्त गट जास्त विक्रियाशील आहे.कारण जस्त गटातील मूलद्रव्यांचेवितळबिंदू व उकळबिंदू कमी आहेत. पारा हे कोठी तापमानाला द्रवरूप असणारेएकमेव धातवीय मूलद्रव्य आहे.

या गटाचे काही बाबतीत असंक्रमणी गट २ अ शी, विशेषतः क्षारीय मृत्तिका मूलद्रव्यांशी (Ca, Sr, Ba) साम्य आहे.दोहोंचा इलेक्ट्रॉन विन्यास-s2 आणि-d10s2 असा आहे.दोन्ही गटांतील मूलद्रव्ये द्विसंयुजी आहेत.  दोहोंची सजल सल्फेटे समरूपी आहेत.त्यांची K2SO4’ HgSO4 – 6H2O आणि K2SO4 · MgSO4 · 6H2O ही दुहेरी लवणे समधर्मी आहेत.जस्त गट जास्त अभिजात, सहसंयुजी संयुगेकरण्याकडे कल  असणारा, जटिल लवणे तयार करण्याचीक्षमता जास्त असलेला व कमीक्षारीय आहे.

सर्वसाधारणपणे गटातील पहिला सदस्य इतरांपेक्षा वेगळा असतो, तर या गटातजस्त व कॅडमियम हे रासायनिक दृष्ट्या जवळचे आहेत व तिसरा सदस्य पारा हावेगळा आहे.विक्रियाशीलता जस्तापासून पाऱ्याकडे कमी हेत जाते.जस्तकॅडमियम यांची विरल अम्लाशी विक्रिया होते.पारा फक्त ऑक्सिडीकारक अम्लाशीविक्रिया करतो. ॲल्युमिनियमप्रमाणे जस्त व कॅडियमाची क्षाराबरोबर विक्रियाहोऊन झिंकेट कॅडमियेट तयार होतात.

यांची ZnO, CdO व HgO अशी ऑक्साइडे तयार होतात. ZnO हे उभयधर्मी आहे. CdO व HgO ही ऑक्साइडे क्षारीय आहेत. ZnO व CdO यांचे संप्लवन होते यावरून तीबरीचशी सहसंयुजी असावीत. HgO तापवल्यास त्यापासून पारा धातू मिळते.हीविक्रिया चांदी व सोने यांप्रमाणे आहे.पारा ही अभिजात धातू समजली जाते. CdO व HgO ही अनुक्रमे तपकिरी व तांबड्या रंगाची आहेत परंतु या गटातीलमूलद्रव्यांची बहुतेक लवणे रंगहीन आहेत.जस्त व कॅडमियम यांची पेरॉक्साइडे (ZnO2, व CdO2) तयार होतात, इतर संक्रमणीमूलद्रव्यांची पेरॉक्साइडे तयार होत नाहीत.जस्त व कॅडमियम यांचीहायड्रॉक्साइडे तयार होतात, पाऱ्याचे तयार होत नाही.सर्वसाधारणपणे जस्तलवणे सजल व आर्द्रताशोषक आहेत. कॅडमियम हॅलाइडे स्वयंजटिल आयन तयार करतात उदा.,

CdCI2Cd2++2Cl

Cd2++4Cl⇌ [CdCl4]2-

कॅडमियम आयोडाइन (CdI2) यात CdI+, CdI2, CdI3 आणि CdI42- यांचे मिश्रण असू शकते. या मूलद्रव्यांपासून जी हॅलाइडे तयार होतातत्यांमधील बंध प्रकारावर विद्यूत् ध्रुवण क्रियेचा (विद्युत् क्षेत्र लावूनधन आणि ऋण विद्यूत् भारांत सापेक्ष विस्थापन घडवून आणण्याच्या क्रियेचा) परिणाम होतो असे आढळते.यामधील धन आयनाची ध्रुवण शक्ती व ऋण आयनांची ध्रुवणक्षमता जास्त प्रमाणाच्या असतील, तर सहसंयुजी संयुगे तयार होण्याकडे वाढता कल दिसतो.धन आयनाची ध्रुवणशक्ती या गटात Zn → Cd→Hg या क्रमाने वाढत जाताना दिसते.ही सर्व मूलद्रव्ये जटिल लवणे तयार करतात. जटिल लवणे सायनाइड आयन (CN), अमोनिया (NH3), अमाइने, हॅलाइन आयन इत्यादींशी होऊ शकतात.

‘f’ वर्ग मूलद्रव्ये : लँथॅनाइड श्रेणी किंवा विरल मृत्तिका यातील मूलद्रव्ये (अणुक्रमांक ५८ ते ७१) व ॲक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्ये (अणुक्रमांक ९० ते १०३) या वर्गात मोडतात. लँथॅनाइड श्रेणीतील मूलद्रव्यांची माहिती ‘विरलमृत्तिका’ या नोंदीत दिलेली आहे.ॲक्टिनाइड श्रेणीतीलमूलद्रव्यांसंबंधीच्या माहितीकरिता प्रस्तुत नोंदीत अगोदरच्या भागात दिलेलीमाहिती आणि ‘मूलद्रव्ये, मानवनिर्मित’ व ‘युरेनियमोत्तर मूलद्रव्ये’ यानोंदी पहाव्यात.

पहा : अणु व आणवीय संरचना आवर्त सारणी किरणोत्सर्ग मूलद्रव्ये, मानवनिर्मित युरेनियमोत्तर मूलद्रव्ये   विरल मृत्तिका संक्रमणी मूलद्रव्ये समस्थानिक.यांखेरीज प्रत्येक मूलद्रव्यांवरील नोंद.

संदर्भ : 1. Abbott, D. Inorganic Chemistry, Londan, 1965.

2. Allers, L.H. Abundance of the Elements. New York, 1961.

3. Brockington, J. Students Guide to Inorganic Chemistry, London, 1966.

4. Herrmann, G. Superheavy-Elements Research, Nature, 16 August 1979.

5. Jackson, D. F. Search for Superheavies, Nature, 20 April 1978.

6. Kaye, G. W. CLady, T.H. Tables of Physical and Chemical constants, London, 1966.

7. Kondratyev, V. The Structure of Atoms and Molecules, Moscow.

8. Lagowski, J. J. The Structure of Atoms, New York, 1964.

9. Laidler, K.J. Fordsmith, M. Chemical Elements, New York, 1970.

10. Lee, J. D. Concise Inorganic Chemistry, London 1973.

11. Oldenberg, o. Introduction to Atomic and Nuclear Physics, New York, 1966.

12. Seaborg. G.T. Man-Made Transuranium Elements, Englewood Cliffs, N. J. 1963.

चिपळोणकर, व,. त्रिं. घाटे रा. वि.