माघील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा

क्र. १. चालू 
११  १२  १३  १४  १५  १६  १७  १८ 
१०·५ ११४ १८३ ४·९३ तपकिरी, घन १८३०.४ बी. कूरत्वा (१८११), जे. एल्. गे-ल्यूसॅक (१८१३)
१२·१ -०·३३ -११२ -१०७·१ ०·००५८ रंगहीन, वायू १४६९·६२ डब्ल्यू. रॅम्झी व एम्. डब्ल्यू. ट्रॅव्हर्झ (१८९८)
३·९ २८·५ ६७० १·८७ पांढरा, घन ८५२१·१० आर्. बन्सन व जी. आर्. किरखोफ (१८६०)
५·२ ८५० १५०० ३·६ पांढरा, घन ५५३५·५५ एच्. डेव्ही (१८०८)
५·६ ८२६ १८०० ६·१९ पांढरा, घन ६२४९·९३ सी. जी. मूसांडर (१८३९),
६·९ ७९५ ३४६८ ६·७८ करडा, घन ५६९९·२३ एम्. एच्. क्लापरोट (१८०३)
५·८ ९३५ ३१२७ ६·७८ पिवळा, घन ४९५१·३६ सी. जी. मूसांडर (१८४१), एल्. द. ब्वाबोद्राँ (१८७९)
६·३ ३६·० (१८ से.) १०२४ ३०२७ ७·० पिवळा, घन ४९२४·५३ सी. जी. मूसांडर (१८४१), सी. ए. फओन वेल्सबाख (१८८५)
१०३५ २७३० घन जे. ए. मारिन्स्की व एल्. ई. ग्लेंडेनीन (१९४७)
५·६ १०७२ १९०० ६·९३ करडा, घन ४२९६·७४ एल्. द. ब्वाबोद्राँ (१८७९), सी. ए. फोन वेल्सबाख (१८८५)
५·७ ८२६ १४३९ ५·२४ करडा, घन ४२०५·०५ ई. दमार्से (१८९६)
६·२ १३१२ ३००० ७·९५ करडा, घन ४२२५·८५ जे. सी. मारीन्याक(१८८०). एल्. द. ब्वाबोद्राँ (१८९६)
६·७ १३५६ २८०० ८·३३ रूपेरी, घन ४३२६·४७ सी. जी. मूसांडर (१८४१)
६·८ १४६० २६०० ८·५६ करडा, घन ४२११·७२ एल्. द. ब्वाबोद्राँ (१८८६)
१४६१ २६०० ८·७६ करडा, घन ३७९६·७५ पी. टी. क्लेव्हे (१८७९), ओ. होमबर्ग (१९११)
१४९७ २९०० ९·१६ करडा, घन ४००७·९७ सी. जू. मूसांडर (१८४३)
१५४५ १७२७ ९·३५ घन ४०९४·१९ पी. टी. क्लेव्हे (१८७९),

सी. जेम्स (१९११)

६·२ ८२४ १४२७ ७·०१ रूपेरी, घन ३९८७·९८ जे. सी. मारीन्याक (१८७८), जी. अर्बेन (१९०७), सी. ए. फोन वेल्सबाख (१९०८)
५·० १६५२ ३३२७ ९·७४ करडा, घन ३२८१·७४ जी. यूर्वी (१९०७), सी. ए. फोन वेल्सबाख (१९०८), सी. जेम्स (१९११)
७·० २२०० &gt३२०० १३·३ पांढरा, घन २८६६·३७ डी. कॉस्टर व जी. हेव्हेशी (१९२३)
७·९ &gt३००० &gt४१०० १६·६ काळा, घन २६५३·२७ ए. जी. एकबर्ग (१८०२)
८·६ ०·३३ ३३७० ५९०० १९·३ करडा-पांढरा,

घन

४००८·७५ जे. जे. देलूयार व एफ्. देलूयार (१७८३)
७·९ ३२०० ५६२७ २०·५ पांढरा, घन ३४६०·४६ डब्ल्यू. नोडॅक, आय्. टॅक व ओ. बेर्ख (१९२५)
८·७ २७०० &gt५३०० २२·७ पांढरा, घन २९०९·०६ एस्. टेनंट (१८०२–३)
९·० २४५० &gt४८०० २२·६ पांढरा, घन ३२२०·७८ एस्. टेनंट (१८०२–३)
९·० ०·९७ १७७४ ४३०० २१·५ पांढरा, घन ३०६४·७१ प्राचीन
९·२ -०·१५ १०६३ २६०० १९·३ पिवळा, घन २६७५·९५ प्राचीन

क्र. १. चालू 
१  २  ३  ४  ५  ६  ७  ८  ९  १० 
पारा Hg ८० २००·५९ ०·०२ ०.६० ~०·५ १·५५ १·१० २,१
थॅलियम TI ८१ २०४·३७ ०·०१ ०·१३ ~२ १·७१ ०·९५ १,३
शिसे Pb ८२ २०७·१९ २·९० १·३ १६ १·७५ ०·८४ २,४
बिस्मथ Bi ८३ २०८·९८० ०·०१ ०·१९ ०·२ १·४६ ०·७४ ३,५
पोलोनियम Po ८४ (२१०) लेशमात्र १·४ २,४
ॲस्टटीन At ८५ (२१०) लेशमात्र १·४०
रेडॉन Rn ८६ (२२२) लेशमात्र २·२
फ्रान्सियम Fr ८७ (२२३) लेशमात्र २·७
रेडियम Ra ८८ (२२६·०५) लेशमात्र २·२० १·५२
ॲक्टिनियम Ac ८९ (२२७) लेशमात्र २·० १·११
थोरियम Th ९० २३२·०३८ ०·०३ ०·०८ १३ १·६५
प्रोटॅक्टिनियम Pa ९१ (२३१) लेशमात्र
युरेनियम U ९२ २३८·०३ ०·०१८ ०·०२ १·४२ ६,५,४,३
नेपच्यूनियम Np ९३ (२३७) ६,५,४,३
प्लुटोनियम Pu ९४ (२४२) ६,५,४,३
अमेरिसियम Am ९५ (२४३)
क्यूरियम Cm ९६ (२४७)
बर्केलियम Bk ९७ (२४९) ४,३
कॅलिफोर्नियम Cf ९८ (२५१)
आइन्स्टाइनियम Es ९९ (२५४)
फेर्मियम Fm १०० २५७

क्र. १. चालू 
११  १२  १३  १४  १५  १६  १७  १८ 
१०·४ -०·१७ -३९ ३५६·९ १४·२ पांढरा, द्रव १८४९·६८ थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. ३००), प्लिनी व डायस्कॅरिडीझ (इ. स. पू. पहिले शतक)
६·१ ३०४ १४५७ ११·६ करडा, घन ३५१९·२४ डब्ल्यू. क्रुक्स व सी. ए. लामी (१८६१)
७·४ -०·१२ ३२८ १९५५ ११·३ करडा, घन ४०५७·८३ प्राचीन
७·३ -०·१२ २७१ १४५० ९·८ पांढरा, घन ३०६७·७२ प्राचीन पॅरासेल्सस,

ॲग्रिकोला (१५४६),

जे. एच्. पॉट (१७३९)

८·४ २५४ ९६२ ९·४ करडा, काळा घन २४४९.९९ प्येअर क्यूरी व मारी क्यूरी (१८९८)
२५० ३५० घन डी. आर्. कॉर्सन, के. आर्. मॅकेंझी, ई. जी. सेग्रे (१९४०)
१०·७ -११० -६१·८ ०·००९७ रंगहीन, वायू १७८६·०७ एफ्. ई. डोर्न (१९००)
२८·५ ६७० १·८७ घन एम्. पेरी (१९३९)
५·३ ९६० ११४० पांढरा, घन ४८२५·९१ प्येअर क्यूरी व मारी क्यूरी (१८९८)
६·९ १२३० ३१०० १०·१ घन ए. दव्यर्न (१८९९), एफ्. गीझेल (१९०२)
१८४५ &gt३००० ११·३ पांढरा, घन ३७१९·४४ जे. जे. बर्झीलियस (१८२८)
१२०० ४००० १५·४ पांढरा, घन ओ. हान व एल्. माइटनर (१९१७), एफ्. सॉडी व जे. क्रॅन्स्टन (१९१७)
४·० १·७२ ११५० ३८०० १८·७ पांढरा, घन ३८१२·०० एम्. एम्. पेटिगॉट (१८४१)
६३७ पांढरा, घन ई. एम्. मॅकमिलन व पी. एच्. आवेल्सन (१९४०)
६४० ३२३० १९·८ घन जी. टी. सीबॉर्ग, ई. एम्. मॅकमिलन, जे. डब्ल्यू. केनेडी व ए. सी. वाल (१९४०)
९९५ ११·८ पांढरा, घन जी. टी. सीबॉर्ग, आर्. ए. जेम्स व एल्. ओ. मॉर्गन (९१४४–४५)
१३४० पांढरा, घन जी. टी. सीबॉर्ग, आर्. ए. जेम्स, ए. धिओर्सो (१९४४)
एस्. जी. टॉम्पसन. ए. धिओर्सो व जी. टी. सीबॉर्ग (१९४९)
जी. टी. सीबॉर्ग, एस्. जी. टॉम्पसन, ए. धिओर्सो व के. स्ट्रीट (ज्युनी.) (१९५०)
ए. धिओर्सो (१९५२)
ए. धिओर्सो, एस्, जी. टॉम्पसन, जी. एच्. हिगिन्स, जी. टी. सीबॉर्ग (१९५३)
क्र. १. चालू
१०
मेंडलेव्हियम Md १०१ (२५६)
नोबेलियम No १०२ (२५३)
लॉरेन्सियम Lr १०३ २५७
रदरफर्डियम (Rf) १०४ २५७
(Ha) १०५ २६०
१०६
१०७
१०८
१०९
११०
c. a. u. –वैश्विक विपुलता एकक (दशलक्ष सिलिकॉन अणुसंख्येच्या सापेक्ष)

क्र. १. चालू 
११ १२  १३  १४  १५  १६  १७  १८ 
ए. धिओर्सो, बी. जी. हार्वी, जी. आर्. शोपॅन, एस्.जी.

टॉम्पसन व जी. टू सीबॉर्ग (१९५५)

नोबेल इन्स्टिट्यूट (१९५७)
ए. धिओर्सो, टी. सिक्केलँड, ए. ई. लार्श व आर्. एम्.

लॅटिमर (१९६१)

ए. धिओर्सो आणि सहकारी (१९७०)
लॉरेन्स बर्कली लॅबोरेटरी (कॅलिफोर्निया) व जॉईंट रिसर्च (डूब्‌ना) (१९७४)
––
*-दशलक्ष भागातील अंश वजनाप्रमाणे धातू

कोष्टकात अणुत्रिज्या, आयनी त्रिज्या आणि वर्णपटातील तीव्रतम रेषेची तरंगलांबी अँगस्ट्रॉम (Å) या एककात दिलेली आहेत. (१ Å= १०-१०मी.).

मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म मोठ्या प्रमाणात त्याच्या इलेक्ट्रॉन विन्यासावर अवलंबून असतात. आवर्त सारणीमधील एकंदर मूलद्रव्यांचे त्यांच्या इलेक्ट्रॉन विन्यासानुसार s, p, d, f ………. इ. वर्ग पाडता येतात. कोणत्याही एका वर्गातील सर्वमूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म ढोबळमानाने एकसमान असे असल्यामुळे त्याचेसंकलित वर्णन एका ठिकाणी करणे सोईस्कर ठरते. अशा प्रकारचे वर्गानुसारतुलनात्मक व सापेक्ष वर्णन पुढे दिले आहे.

इलेक्ट्रॉन विन्यासाप्रमाणे मूलद्रव्यांचे वर्ग : आणवीय इलेक्ट्रॉन विन्यास लक्षात घेता मूलद्रव्यांचे पुढीलप्रमाणे वर्ग पडतात : ज्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेत s इलेक्ट्रॉन असतात त्यांना s वर्गमूलद्रव्ये म्हणतात व ज्यांच्या कक्षेत p इलेक्ट्रॉन असतात त्यांना p वर्गमूलद्रव्ये म्हणतात. s व p या दोन वर्गांच्या मध्ये येणारी मूलद्रव्ये d वर्ग किंवा संक्रमणी मूलद्रव्ये समजतात. त्यात उपांत्य परिकक्ष [⟶ पुंज रसायनशास्त्र] d चा विस्तार होत असतो. ज्या मूलद्रव्यांत उप-उपांत्य f परिकक्षाचा विस्तारहोत असतो त्यांना f वर्ग मूलद्रव्ये म्हणतात. बोर-टॉम्पसन आवर्त सारणीतील (कोष्टक क्र. ३ पृ. ८६२) गट १ अ व २ अ मधील मूलद्रव्ये s वर्गात आहेत. गट ३अ ते ७ अ व ० (शून्य) या गटांतील मूलद्रव्ये p वर्गात आहेत. गट १ ब ते गट ८मधील संक्रमणी मूलद्रव्ये ही d वर्गात मोडतात. लँथॅनाइड व ॲक्टिनाइडश्रेणींतील मूलद्रव्ये f वर्गातील होत. या निरनिराळ्या वर्गातील उभ्यास्तंभात असणाऱ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म थोड्या फार फरकांने समान असतात. याविविध वर्गातील मूलद्रव्यांसंबंधीची माहिती थोडक्यात खाली दिली आहे. अधिकतपशीलवार माहिती प्रत्येक मूलद्रव्यावरील स्वतंत्र नोंदीत पहावी.

हायड्रोजन : हायड्रोजन हे आवर्त सारणीतील एक अणुक्रमांकाचे पहिल्या आवर्तातील व सर्वांत सोप्या संरचनेचे असे मूलद्रव्य आहे. केंद्रस्थानी + १ भाराचा प्रोटॉन व भोवती फिरणारा एक इलेक्ट्रॉन अशी याच्या अणूची रचनाआहे. गट १ मधील क्षारीय (अल्कली) धातूंमध्येही शेवटच्या परिकक्षात एकचइलेक्ट्रॉन असतो परंतु या धातूंचा कल तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्यालादेण्याकडे व स्वतः ऋणायन (धन विद्युत् भारित व विद्युत् विच्छेदनातऋणाग्राकडे आकर्षिला जाणारा आयन) तयार करण्याकडे असतो. हायड्रोजनाचा कलइलेक्ट्रॉन गमावण्याकडे नसतो. तो सहसंयुजी बंध तयार करू शकतो. हायड्रोजन वहॅलोजने या दोहोंना अक्रिय वायूसारखी संरचना मिळविण्याकरिता एक इलेक्ट्रॉनकमी असतो. हॅलोजने तो पुष्कळशा विक्रियामध्ये सहज मिळवू शकतात व धनायानतयार होतो परंतु हायड्रोजनाला उच्च विद्युत् घनता असलेल्या (इलेक्ट्रॉनदेऊन टाकण्याची प्रवृत्ती असलेल्या) धातूबरोबरच्या विक्रियेतच हे शक्य असतेउदा., (Li+H). हायड्रोजनाला आभासी हॅलोजन असेहीम्हणतात. हायड्रोजनाचा धन आयन होऊ शकतो. हायड्रोजन अणूला स्वतंत्र अस्तित्वनाही. दोन अणू सहसंयुजी बंधाने एकत्र येऊन त्याचा रेणू बनतो.


हायड्रोजनाचे गुणधर्म गट १ व गट ७ मधील मूलद्रव्यांसारखे नसले, तरी संरचनेतील साम्याच्या आधारे त्याला गट १ च्या वर व गट ७ च्या वर आवर्त सारणीत जागा दिली जाते. वास्तविक त्याचा स्वतःचा वेगळा गट मानून स्वतंत्र जागा द्यायला हवी.

त्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म इत्यांदींकरिता ‘हायड्रोजन’ ही नोंद पहावी.

 

S वर्ग मूलद्रव्ये : गट १ अ :[ लिथियम (Li), सोडियम (Na), पोटॅशियम (K), रुबिडियम (RB), सिझियम (Cs), आणि फ्रान्सियम (Fr) हायड्रोजन (H) सोडून]. या गटातील सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. त्यांना क्षारीय धातू असे म्हणतात. त्यांच्यात बहुरूपता (दोन अगर अधिक भौतिक रूपांत अस्तित्वात असण्याचा गुणधर्म) नाही. सोडियम व पोटॅशियम निसर्गात खूप प्रमाणात आहेत. सिझियम विरल आहे. फ्रान्सियमाचे किरणोत्सर्गी समस्थानिक निसर्गात आढळत नाहीत. Fr(२२३) हा समस्थानिक सूक्ष्म प्रमाणात आहे. या गटातील मूलद्रव्यांचेवैशिष्ट्य असे की, त्यांच्या आणवीय संरचनेत बाहेरच्या कक्षेत फक्त एकच s इलेक्ट्रॉन आहे. तो s इलेक्ट्रॉन गोलीय परिकक्षेत आहे. आधीच्या कक्षालक्षात न घेता फक्त शेवटच्या परिकक्षेचे चित्रण केले, तर ते पुढीलप्रमाणेहोईल :

Li [He] 2 s1    

Na [Ne] 3 s

K [Ar] 4 s1     

Rb [Kr] 5 s1  

Cs [Xe] 6 s

Fr [Rn] 7 s1

 

संयुजी इलेक्ट्रॉन निघून गेल्यावर अणूंची जी संरचना शिल्लक राहते ती अक्रिय वायूंच्या संरचनेसारखी असते. अक्रिय वायू कोणते ते चौकटी कंसात दिले आहे. (संपूर्ण इलेक्ट्रॉन विन्यासाकरिता ‘अणु व आणवीय संरचना’ ही नोंद पहावी).

या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनीय संरचनेच्या सारखेपणामुळे त्यांच्यारासायनिक गुणधर्मांत सारखेपणा आढळतो. सर्व मूलद्रव्ये पांढऱ्या रंगाची, मऊ, अतिशय क्रियाशील व एकसंयुजी आहेत. यांची रंगहीन आयनी संयुगे बनतात. फक्तअम्ल मूलक (प्रतिष्ठापन करण्यात येणारा हायड्रोजन काढून टाकल्यावर उरणाराअम्लाचा रेणू) रंगीत असेल, तरच रंगीत संयुगे असतात उदा., क्रोमेटे आणिपरमँगॅनेटे. मूलद्रव्यांच्या अणूंच्या व आयनांच्या आकारमानावरून त्यांच्यागुणधर्माची कल्पना येते. अणूंच्या मोठ्या आकारमानामुळे त्यांची घनता कमीओहे. केंद्रापासून बाहेरची कक्षा दूर असल्यामुळे तिच्यातील इलेक्ट्रॉनकाढून घेणे सापेक्षतेने सोपे आहे. व त्यामुळे त्यांचे आयनीकरण वर्चस् कमीआहे. अणूच्या वाढत्या आकारमानाबरोबर त्याच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनकेंद्रापासून दूर होतो व केंद्राचे त्यावरील वर्चस्व कमी होते आणि त्यामुळे आयनीकरण वर्चस् कमी होत जाते. याचाच अर्थ असा की, लिथियमपासून सिझियमाकडे धन विद्युती वाढत जाते. या मूलद्रव्यांचे किरणीयन केल्यास (विद्युत् चुंबकीय प्रारण-तरंगरूपी ऊर्जा-पृष्ठावर पाडल्यास) त्यांतून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होतात [⟶ प्रकाशविद्युत्]. त्यामुळे सिझियम व पोटॅशियम यांचा प्रकाशविद्युत् घटात उपयोग होतो. या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन वरची ऊर्जा पातळी गाठेपर्यंत उत्तेजित करता येतात, हे ज्वाला कसोटीत दिसून येते. या उत्तेजित स्थितीत दृश्य प्रकाशात निरनिराळे रंग दिसतात व मूळ ऊर्जा पातळीवर आल्यावर ते नाहीसे होतात. यांचे वितळबिंदू व उकळबिंदू मुळात कमी आहेत व अणूंचे आकारमान वाढत जाते तसे ते आणखी कमी होत जातात. या उभ्या स्तंभातील पहिले सदस्य मूलद्रव्य लिथियम हे इतरांपेक्षा वेगळे आहे. त्याचे गुणधर्म इतर मूलद्रव्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत. आवर्त सारणीतील बहुतेक सर्व उभ्या स्तंभांतील पहिल्या सदस्य मूलद्रव्याचे गुणधर्म उरलेल्या मूलद्रव्यांपेक्षा निराळे असतात.

या गटातील मूलद्रव्यांच्या संयुगांची जालक ऊर्जा (आयनी स्फटिकातील आयन एकमेकांपासून अनंत अंतरापर्यंत विलग करण्यासाठी लागणारी ऊर्जा) वरून खाली म्हणजे Li ते Cs कमी होत जाते. लिथियम आयनाचे (Li+) पृष्ठफळ सर्वांत कमी असल्याने त्याच्या पृष्ठभागावर विद्युत् भाराची घनता जास्त असते. त्यामुळे Li+ आयन हा लिथियम संयुगांच्या स्फटिक जालकामध्ये घट्टपणे चिकटून राहातो वसंयुगांची विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) कमी होते. उदा., Li2C03 व Li3PO4ही संयुगे अविद्राव आहेत. ही संयुगांची विद्राव्यता H ते Cs वाढत जाते. Li2CO3 हे अविद्राव्य, तर Na2CO3 व K2CO3 ही विद्राव्य आहेत. या जालक ऊर्जेमुळे यांच्या हायड्रॉक्साइडांची क्षारकीयप्रबलता (धातवीय व OH आयन विलग होण्याचे प्रमाण) Li ते Cs वाढत जाते. CsOH व FrOH ही सर्वात प्रबल क्षारकीय आहेत. LiOH हे दुर्बल क्षारकीय आहे. LiOH पाण्यात विरघळविल्यास फार थोडे OHगट निर्माण होतात कारण Li+ आयनावरील विद्युत् भारामुळे त्याचे OH आयनाशी जास्त आकर्षण निर्माण होते.


कोष्टक क्र.२. मूलद्रव्ये व त्यांचे समस्थानिक 
अणुक्रमांक  मूलद्रवे  स्थिर समस्थानिक  किरणोत्सर्गी  समस्थानिक 
हायड्रोजन १(९९·९८),२(०·०१) ३(β) 
हीलियम ३(१·३ X १०-४), ४(∽१००)  ५(α), ६(β)
लिथियम ६(७·५), ७(९२·५) ५(α), ८(β)
बेरिलियम ९(१००) ७(K, γ ), ८(α), १०(β
बोरॉन १०(१८·७),११(८१·३) ९(२α), १२(β,γ) 
कार्बन १२(९८·९), १३(१·१) १०(β+,  γ   ), ११(β+),१४(β),

१५(β, γ ) 

नायट्रोजन १४(९९·६२),१५(०·३८) १२(β+), १३(β+),१६(β ), १७(β
ऑक्सीजन १६(९९·७६),१७(०·०४),

१८(०·२०).

१४(β+, γ), १५(β+),१९(β, γ) 
प्ल्युओरीन १९(१००). १७(β+), १८(β+),२०(β, γ ), २१(β
१० निऑन २०(९०·८), १(&lt०·३),२२(८·९) १८(β+), १९(β+),२३(β, γ), २४(β, γ) 
११ सोडियम २३(१००) २०(β+), २१(β+),२२(β,K, γ), २५(β, γ) 
१२ मॅग्नेशियम २४(७७·४),२५(११·५),२६(११·१) २३(β+), २७(β, γ), २८(β, γ)  
१३ ॲल्युमिनियम २७(१००) २४(β+,γ), २५(β+,γ), २६(β+,Kγ),२८(β, γ), २९(β,  γ) 
१४ सिलिकॉन २८(९२·२१),२९(४·७०),

३०(३·०९)

२७(β+),३१(β, γ), ३२(β
१५ फॉस्फरस ३१(१००) २८(β+,γ),

२९(β+,γ), ३० (β+),३२(β),३३(β),

३४(β, γ) 

१६ गंधक ३२(९५·०),३३(०·८),३४(४·२),

३६(०·०२)

३१(β+),३५(β),३७(β, γ) 
१७ क्लोरीन ३५(७५·४),३७(२४·६) ३२(β+, γ), ३३(β+,γ), ३४(β+,γ), ३४(β, K), ३८(β, γ),    ३९(β, γ) 
१८ आर्गॉन ३६(०·३३७),३८(०·०६१),

४०(९९·६०)

३५(β+,γ), ३७(K), ३९(β),४१(β, γ) 
१९ पोटॅशियम ३९(९३·१),४०(०·०१),४१(६·९) ३८(β+,γ),४०(β,K,γ), ४२(β,  γ), ४३(β, γ), ४४(β, γ) 
२० कॅल्शियम ४०(९६·९६),४२(०·६४),४३, ४४(२·६),४६,४८. ३९(β+), ४१(K), ४५(β), ४७(β, γ), ४९(β, γ) 
२१ स्कॅंडियम ४५(१००) ४०(β+,γ),४१(β+), ४२(β+),

४३(β+,K,γ),४४(β+,K,γ), ४६(β,γ),

४७(β,  γ),४८(β, γ), ४९(b)

२२ टिटॅनियम ४६(७·९३), ४७(७·२८),

४८(७३·९४), ४९(५·५१), ५०(५·३४)

४४(K,γ), ४५(β+,γ), ५१(β,  γ) 
२३ व्हॅनेडियम ५०(०·२५), ५१(९९·७५) ४६(β+), ४७(β+),

४८(β+,K,γ), ४९(K), ५२(β, γ) 

२४ क्रोमियम ५०(४·३१), ५२(८३·७६),

५३(९·५५), ५४(२·३८)

४८(K,γ), ४९(β+,γ),

५१(K,γ), ५५(β)

२५ मॅंगॅनीज ५५(१००) ५०(β+), ५१(β+), ५२(β+,K,γ ),५३(K), ५४(K,γ), ५६(β,γ),

५७(β, γ), 

२६ लोखंड ५४(५·८२), ५६(९१·६६), ५७(२·१९), ५८(०·३३) ५२(β+,K,γ ), ५३(β+,γ), ५५(K), ५९(β,  γ),

६०(β, γ) 


कोष्टक क्र. २. मूलद्रव्ये व त्यांचे समस्थानिक (पुढे चालू) 
अण-क्रमांक  मूलद्रवे  स्थिर समस्थानिक  किरणोत्सर्गी  समस्थानिक 
२७ कोबाल्ट ५९(१००). ५४(β+), ५५(β+,K,γ), ५६(β+,K,γ),५७(K,γ),

५८(β+,K,γ), ६०(β, γ), ६१(β, γ), ६२(β, γ ) 

२८ निकेल ५८(६७·८८), ६०(२६·२२), ६१, ६२(३·६६), ६४. ५६(K,γ), ५७(β+,K,γ), ५९(K), ६३(β), ६५(β, γ),

६६(β).

२९ तांबे ६३(६९·०९), ६५(३०·९१) ५८(β+), ५९(β+,K,γ), ६०(β+,γ), ६१(β+,K,γ), ६२(β+,K,γ),६४(β,β+,K ,γ),६६(β, γ), ६७(β, γ), 
३० जस्त ६४(४८·९), ६६(२७·८), ६७(४·१), ६८(१८·६), ७० ६२(β+,K,γ), ६३(β+,K,γ), ६५(β+,K,γ),६९(β, γ),

७१(β, γ), ७२(β, γ). 

३१ गॅलियम ६९(६०·१), ७१(३९·९) ६४ (β+, γ), ६५(β+,K,γ),६६(β+,K,γ), ६७(K,γ),

६८(β+,K, γ), ७०(β, γ), ७२(β, γ),७३(β

३२ जर्मेनयम ७०(२०·५२), ७२(२७·४३), ७३(७·७६), ७४(३६·५४), ७६(७·७६) ६७(β+, γ),६८(K), ६९(β+,K, γ), ७१(K), ७५(β, γ),

७७(β, γ), ७८(β, γ) 

३३ अर्सेनिक ७५(१००). ६९(β+, γ), ७०(β+,K, γ), ७१(β+,K,γ), ७२(β+,K,γ),  

७३(K), ७४(β+,K, γ) , ७६(β, γ),

७८(β, γ), ७९(β)

३४ सिलिनियम ७४, ७६(९·०२), ७७(७·५८), ७८(२३·५२), ८०(४९·८२),

८२(९·१९)

७२(K), ७३(β+,K, γ), ७५(K, γ), ७९(β,γ), ८१(β,γ),

८३(β,γ), ८४(β

३५ ब्रोमीन ७९(५०·५४), ८१(४९·४६). ७५(β+,K, γ), ७६(β+,K, γ), ७७(β+,K, γ),

७८(β+,K, γ), ८०(β,K, γ), ८२(β, γ), ८३(β ),

८४(β,γ), ८५(β), ८७(β,γ) 

३६ क्रिप्टॉन ७८, ८०, ८२(११·५०), ८३(११·४८), ८४(५७·०२), ८६(१७·४३) ७६(β+, γ),७७(β+,K, γ), ७९(β+,K, γ), ८१(K, γ),

८४(β,γ), ८७(β ), ८८(β,γ), ८९(β,γ) 

३७ रुबिडियम ८५(७२·२), ८७(२७·८). ८१(β+,K, γ), ८२(β+,K,γ), ८३(K, γ),

८४(β+,K, γ), ८६(β,γ), ८७(β), ८८(β,γ),  

८९(β,γ), ९०(β ) 

३८ स्ट्रॉंशियम ८४, ८६(९·८६), ८७(७·०२), ८८(८२·५६) ८२(K), ८३(β+,K, γ), ८५(K, γ), ८९(β),९०(β),

९१(β,γ), ९२(β,γ) 

३९ इट्रियम ८९(१००). ८६(β+, γ), ८७(K, γ), ८८(K, γ), ९०(β), ९१(β, γ),

९२(β, γ), ९३(β,γ),९४(β, γ)

४० झिर्कोनियम ९०(५१·५), ९१(११·२), ९२(१७·१), ९४(१७·४), ९६(२·८). ८७(β+,K, γ), ८८(K), ८९(β+,K, γ), ९३(β),

९५(β, γ), ९७(β,γ) 

४१ निओबियम ९३(१००). ९०(β+, γ), ९१(K, γ), ९२(K, γ), ९४(β, γ), ९५(β, γ),

९६(β, γ), ९७(β, γ) 

४२ मॉलिब्डेनम ९२(१५·८४), ९४(९·०४), ९५(१५·७२), ९६(१६·५३), ९७(९·४६), ९८(२३·७८),

१००(९·६३)

९०(β+,K, γ), ९१(β+,K, γ), ९३(K, γ), ९९(β, γ),

१०१(β, γ) 

४३ टेक्नेशियम ९२(β,K, γ), ९३(β+,K, γ), ९४(β+,K, γ), ९५(K, γ),

९६(K, γ), ९७(K, γ), ९८(β, γ),९९(β, γ),

१००(β, γ),१०१(β,γ) 

४४ रुथेनियम ९६(५·५१), ९८(१·८७),

९९(१२·७२), १००(१२·६२), १०१(१७·०७), १०२(३१·६१), १०४(१८·५८)

९५(β+,K, γ),९७(K, γ), १०३(β, γ), १०५(β, γ),

१०६(β)


कोष्टक क्र.२. मूलद्रव्ये व त्यांचे समस्थानिक (पुढे चालू) 
अण-क्रमांक  मूलद्रवे  स्थिर समस्थानिक (%) किरणोत्सर्गी  समस्थानिक (उत्सर्जन)
४५ ऱ्होडियम १०३(१००) ९९(β+,K, γ), १००(β+,K, γ),१०१(K, γ),

१०२(β+,K, γ),

१०४(β,γ),

१०५(β, γ),

१०६(β, γ),१०७(β, γ) 

४६ पॅलॅडियम १०२(१·०), १०४(११·०), १०५(२२·२), १०६(२७·२), १०८(२६·८), ११०(११·८) १००(K, γ), १०१(β+,K, γ), १०३(K, γ), १०७(β),

१०९(β, γ), १११(β, γ), ११२(β, γ) 

४७ चांदी १०७(५१·४), १०९(४८·६) १०४(β+,K, γ),१०५(K, γ), १०६(β+,K, γ),

१०८(β,K,γ), ११०(β, γ), १११(β,γ), ११२(β, γ),

११३(β), ११४(β), ११५(β)

४८ कॅडमियम १०६, १०८, ११०(१२·३२), १११(१२·६७), ११२(२४·१५), ११३(१२·२१), ११४(२८·९३), ११६(७·६१) १०४(β+, γ), १०५(β+,K, γ), १०७(K, γ), १०९(K),

११५(β,γ), ११७(β, γ) 

४९ इंडियम ११३(४·२), ११(९५·८) १०७(β+,γ), १०८(β+,γ),१०९(β+,K,γ),

११०(β+,K,γ), १११(K, γ), ११२(β+,K, γ),

११४(β,K,γ), ११५(β,γ), ११६(β,γ), ११७(β,γ), 

५० कथिल ११२, ११४, ११५, ११६(१४·३०), ११७(७·६१), ११८(२४·३), ११९(८·५८), १२०(३२·८५), १२२(४·७२), १२४(५·९४) १११(β+,K), ११३(K,γ), १२१(β), १२३(β, γ),

१२५(β, γ) 

५१ अँटिमनी १२१(५७·२५), १२३(४२·७५) ११६(β+,γ), ११७(β+,K,γ), ११८(β+,K,γ),

११९(K,γ), १२०(β+,K,γ), १२२(β,K,γ),

१२४(β,γ), १२५(β,γ), १२६(β,γ), १२७(β,γ) 

५२ टेल्यूरियम १२०, १२२(२·८३), १२३,

१२४(४·५९), १२५(६·९३), १२६(१८·७१), १२८(३१·८६), १३०(३४·४२)

११८(K), ११९(K, γ), १२१(K,γ), १२७(β, γ),

१२९(β,γ), १३१(β,γ), १३२(β,γ), १३३(β,γ) 

५३ आयोडीन १२७(१००) १२२(β+),१२३(K,γ), १२४(β+,K,γ), १२५(K,γ),

१२६(β+,K, γ), १२८(β,K, γ), १२९(β,γ),

१३०(β, γ),१३१(β,γ), १३२(β,γ),१३३(β,γ),

१३४(β,γ), १३५(β,γ), १३६(β,γ) 

५४ झेनॉन १२४, १२६, १२८, १२९(२६·२३), १३०(४·०५), १३१(२१·१४), १३२(२६·९३), १३४(१०·५२), १३६(८·९३) १२३(β+,γ),१२५(K, γ), १२७ (K, γ), १३३(β ),

१३५(β,γ),१३७(β,γ), १३८(β,γ) 

५५ सिझियम १३३(१००) १२५(β+,K,γ), १२६(β+,K,γ), १२७(β+,K,γ),

१२८(β+,K,γ), १२९(K,γ), १३०(β+,K),१३१(K),

१३२(K,γ), १३४(β,γ), १३५(β,γ), १३६(β,γ),

१३७(β), १३८(β,γ), १३९(β

५६ बेरियम १३०, १३२, १३४(२·४२),

१३५(६·५९), १३६(७·८१), १३७(११·३२), १३८(७१·६६)

१२८(K,γ), १२९(β+,γ), १३१(K,γ), १३३(K,γ),

१३९(β,γ), १४०(β,γ), १४१(β,γ) 

५७ लॅंथॅनम १३८, १३९(९९·९१) १३३(β+,γ),१३४(β+,K),१३५(K,γ), १३६(β+,K),

१३७(K), १४०(β,γ), १४१(β,γ), १४२(β,γ) 


कोष्टक क्र. २. मूलद्रव्ये व त्यांचे समस्थानिक (पुढे चालू) 
अण-क्रमांक  मूलद्रवे  स्थिर समस्थानिक (%) किरणोत्सर्गी  समस्थानिक (उत्सर्जन)
५८ सिरियम १३६, १३८, १४०(८८·४७), १४२(११·०८) १३४(K), १३५(K), १३७(K, γ), १३९(K, γ), १४१(β,γ),

१४३(β,γ), १४४(β,γ), १४५(β,γ), १४६(β,γ) 

५९ प्रासिओडिमियम १४१(१००) १३८(β+,K,γ), १३९(β+,K,γ), १४०(β+,K), १४२(β,γ),

१४३(β), १४४(b,γ), १४५(β), १४६(β,γ) 

६० निओडिमियम १४२(२७·११), १४३(१२·१७), १४४(२३·८५), १४५(८·३०), १४६(१७·२२), १४८(५·७३), १५०(५·६२) १३९(β+,K,γ), १४०(K), १४१(β+,K,γ), १४७(β,γ),

१४९(β,γ), १५१(β,γ) 

६१ प्रोमेथियम १४५(K),१४६(β,γ),१४७(β,γ),१४८(β,γ),

१४९(β,γ),१५०(β,γ),१५१(β,γ) 

६२ समॅरियम १४७(१५), १४८(११·२),

१४९(१३·८), १५०(७·४), १५२(२६·८), १५४(२२·७)

१४३(β+), १४५(K,γ),१४६(α), १४७(α), १५१(β,γ),

१५३(β,γ), १५५(β,γ), १५६(β

६३ यूरोपियम १५१(४७·८), १५३(५२·२) १४७(K,γ), १४८(K,γ), १४९(K,γ), १५०(β),

१५२(β,K,γ),१५४(β,K,γ), १५५(β,γ),

१५६(β,γ),१५७(β,γ),१५८(β,γ) 

६४ गॅडोलिनियम १५२, १५४(२·१५), १५५(१४·६०), १५६(२०·५), १५७(१५·७), १५८(२४·९), १६०(२१·९) १५०(α), १५१(K,γ), १५३(K,γ), १५९(β ),

१६१(β,γ) 

६५ टर्बियम १५९(१००) १५६(K,β,γ), १६०(β,γ),१६१(β,γ) 
६६ डिस्प्रोशियम १५६, १५८, १६०(२·२९), १६१(१८·९), १६२(२५·५),

१६३(२५), १६४(२८·२)

१५७(K,γ), १५९(K), १६५(β,γ), १६६(β,γ) 
६७ होल्मियम १६५(१००) १६०(K,γ), १६१(K,γ), १६२(K,γ), १६४(β,K,γ),

१६६(β,γ), १६७(β,γ) 

६८ अर्बियम १६२, १६४, १६६(३३·४),

१६७(२२·९), १६८(२७·१), १७०(१४·९)

१६०(K), १६१(β+,K,γ), १६३(K,γ), १६५(K,γ),

१६९(β), १७१(β),१७२(β)

६९ थुलियम १६९(१००) १६५(K,γ), १६६(K, γ), १६७(K,γ),१६८(β,K,γ),

१७०(β), १७१(β,γ), १७२(β,γ) 

७० इटर्बियम १६८, १७०(३·०३), १७१(१४·३), १७२(२१·८), १७३(१६·२), १७४(३१·८), १७६(१२·७) १६६(K), १६७(K, γ), १६९(K,γ),

१७५(β, γ),

१७७(β, γ) 

७१ ल्सुटेशिसम १७५(९७·५), १७६(२·५) १७०(K,γ),१७१(K,γ), १७२(β+,K,γ), १७३(K,γ),

१७४(β,K,γ), १७६(β,γ), १७७(β,γ) 

७२ हाप्निवम १७४, १७६(५·२), १७७(१८·४), १७८(२७·१), १७९(१३·८), १८०(३५·३) १७२(K,γ), १७३(K,γ),

१७५(K,γ),१८१(β

७३ टँटॅलम १८०, १८१(९९·९८) १७६(K, γ), १७७(K,γ), १७८(β+,K,γ), १७९(K,γ),

१८०(β,K, γ), १८२(β,γ), १८३(β,γ), १८४(β,γ),

१८५(β,γ), १८६(β,γ) 

७४ टंगस्टन किंवा बुल्फ्रॅम १८०, १८२(२६·२), १८३(१४·२६), १८४(२०·७४), १८६(२८·८२) १७६(K,γ), १७७(K,γ), १७८(K), १८०(α,γ), १८१(K,γ), १८५(β,γ), ८१७(β,γ), १८८(β

कोष्टक क्र. २. मूलद्रव्ये व त्यांचे समस्थानिक (पुढे चालू) 
अण-क्रमांक  मूलद्रवे  स्थिर समस्थानिक (%) किरणोत्सर्गी  समस्थानिक (उत्सर्जन)
७५ ऱ्हीनियम १८५(३७·१), १८७(६२·९) १८२(K,γ ), १८३(K,γ), १८४(K,γ), १८६(β,K,γ),

१८७(β,γ), १८८(β,γ), १८९(β,γ), १९०(β, γ) 

७६ ऑस्मियम १८४, १८६(१·५९), १८७(१·६८), १८८(१३·३), १८९(१६·१), १९०(२६·४), १९२(४१) १८२(K), १८३(K,γ),

१८५(K, γ), १९१(β,γ),

१९३(β,γ), १९४(β

७७ इरिडियम १९१(३८·५), १९३(६१·५) १८७(K,γ), १८८(K,γ), १८९(K,γ), १९०(β+,K, γ),

१९२(β,K, γ),१९४(β ),१९५(β ), १९६(β,γ),

१९७(β, γ), १९८(β,γ) 

७८ प्लॅटिनम १९०, १९२, १९४(३२·८),

१९५(३३·७), १९६(२५·४),

१९८(७·२)

१८८(K, γ), १८९(K,γ), १९०(α), १९१(K,γ),

१९३(K,γ), १९७(β,γ), १९९(β,γ) 

७९ सोने १९७(१००) १९१(K,γ),१९२(β+,K,γ), १९३(K,γ ),

१९४(β+,K, γ), १९५(K,γ), १९६(β,K, γ),

१९८(β,γ), १९९(β,γ), २००(β, γ), २०१(β,γ) 

८० पारा १९६, १९८(१०·१), १९९(१७), २००(२३·३), २०१(१३·२), २०२(२९·६), २०४(६·७) १९२(β+,K,γ), १९३(K,γ), १९३(K,γ ), १९४(K,γ), १९५(K,γ), १९७(K,γ), २०३(β,γ), २०५(β,γ) 
८१ थॅलियम २०३(२९·५), २०५(७०·५) १९८(K,γ), १९९(K,γ), २००(K,γ), २०१(K,γ),

२०२(K, γ), २०४(β,K, γ), २०६(β), २०७(β,γ),

२०८(β,γ), २०९(β,γ), २१०(β

८२ शिसे २०४(१·३७), २०६(२६·२६), २०७(२०·८), २०८(५१·५५) २००(K,γ), २०१(K,γ ), २०२(K,γ),२०३(K,γ),

२०५(K), २०९(β), २१०(β,γ),२११(β,γ),

२१२(β, γ),२१४(β,γ) 

८३ बिस्मथ २०९(१००) २०५(K,γ), २०६(K,γ ), २०७(K,γ ),२०८(K),

२०९(α), २१०(α, β), २११(α,γ), २१२(α,β,γ),

२१३(α,β,γ), २१४(β,γ), २१५(β

८४ पोलोनियम २०८(α,γ), २०९(α,K,γ), २१०(α,γ),

२११(α,γ), २१२(α), २१३(α),२१४(α), २१५(α), २१६(α), २१७(α),

२१८(α)

८५ ॲस्टटीन २०९(α,K,γ), २१०(K,γ), २११(α,K,γ), २१५(α),

२१६(α), २१७(α), २१८(α), २१९(α,β)

८६ रेडॉन २१८(α,γ), २१९(α,γ), २२०(α,γ), २२१(α,β),

२२२(α,γ) 

८७ फ्रान्सियम २२०(α), २२१(α,γ), २२२(β), २२३(β
८८ रेडियम २२३(α,γ), २२४(α,γ), २२५(β,α), २२६(α,γ),

२२७(β,γ), २२८(β

८९ ॲक्टिनियम २२५(α), २२६(β), २२७(α,β), २२८(β,γ),२२९(β
९० थोरियम २२७(α,γ), २२८(α,γ), २२९(α), २३०(α,γ), २३१(β,γ),

२३२(α,γ), २३३(β), २३४(β, γ) 

९१ प्रोटॅक्टिनियम २३० (β,K, γ), २३१(α,γ), २३२(β,γ), २३३(β,γ),

२३४(β,γ) 

९२ युरेनियम २३१(α,K, γ), २३२(α,γ),२३३(α,γ),२३४(α,γ),

२३५(α,γ),२३६(α,γ), २३७(β,γ), २३८(α,γ),

२३९(β,γ), २४०(β


कोष्टक क्र. २. मूलद्रव्ये व त्यांचे समस्थानिक (पुढे चालू) 
अण-क्रमांक  मूलद्रवे  स्थिर समस्थानिक (%) किरणोत्सर्गी  समस्थानिक  (उत्सर्जन)
९३ नेपच्यूनियम २३१(α), २३२(K), २३३(K,α), २३४(α,β+,K, γ),

२३५(α, K), २३६(β,K, γ),२३७(α,γ), २३८(β,γ),

२३९(β,γ), २४०(β,γ), २४१(β

९४ प्लुटोनियम २३२(K,α), २३३(K,α), २३४(K,α), २३५(K,α),

२३६(α,γ),२३७(K, γ), २३८(α, γ),२३९(α,γ),

२४०(α, γ), २४१(α, β, γ), २४२(α), २४३(β,γ),

२४४(α), २४५(β,γ), २४६(β

९५ अमेरिसियम २३७(K,α), २३८(K, γ), २३९(α,K, γ), २४०(K, γ),

२४१(α,γ), २४२(β,K, γ), २४३(α, γ), २४४(β),

२४५(β), २४६(β)

९६ क्यूरियम २३८(K, γ), २३९(K), २४०(α), २४१(K, γ), २४२(α),

२४३(α, γ), २४४(α, γ), २४५(α, γ), २४६(α), २४७(α),

२४८(α,SF),२४९(β), २५०(SF)

९७ बर्केलियम २४३(K,α), २४४(K,α), २४५(K,α), २४६(K, γ),

२४७(α, γ), २४८(β,K), २४९(α, β, γ), २५०(β,γ) 

९८ कॅलिफोर्नियम २४४(α, K),  २४५(K,α),  २४६(α), २४७( K),  २४८(α),

२४९(α, γ), २५०(α, γ, SF),२५१(α), २५२(α, γ, SF),

२५३(β), २५४(SF)

९९ आइन्स्टाइनियम २४५(α), २४६(K,α), २४८(K,α), २४९(K,α), २५०(K),

२५१(α, K), २५२(α),   २५३(α, γ), २५४((α, β, K, γ),

२५५(b), २५६(b)

१०० फेर्मियम २४८(α), २४९(α), २५०(α),२५१(α, K),  २५२(α),

२५३(α, K), २५४(α, SF),  २५५(α, SF),  २५६( SF)

१०१ मेंडेलेव्हियम २५५(K, α),२५६(K)
१०२ नोबेलियम २५३(α), २५४(α), २५५(α), २५६(α)
१०३ लॉरेन्सियम २५७(α)
१०४ (रदरफर्डियम) २५७, २५९, २५८? २६१
१०५ (हानियम) २६०, २६१ ?
१०६ २६३,२५९
टीप : K – इलेक्ट्रॉन ग्रास SF – उत्स्फूर्त भंजन

सर्वात प्रचल क्षारकीय आहेत. LiOH हे दुर्बल क्षारकीय आहे. LiOH पाण्यात विरघळविल्यास फार थोडे OH – गट निर्माण होतात. कारण Li + आयनावरील विद्युत् भारामुळे त्याचे OH – आयनाशी जास्त आकर्षण निर्माण होते.


या मूलद्रव्यांची ऑक्साइडे, पेरॉक्साइडे, सुपर ऑक्साइडे [⟶ ऑक्साइडे ] तयार होतात ती अशी :

O2
Li Li2 O
O2 O2
Na Na2O Na2 O2
O2 O2 O2
K K2O K2O2 KO2

रूबिडियम व सिझियम यांची ऑक्साइडे पोटॅशियमाप्रमाणे होतात. Li3o2 हे अस्तित्वात आहे परंतु ते अन्योन्य प्रतिष्ठापनानेच करता येते. त्याचप्रमाणे NaO2 हे ऑक्सिजनाच्या उच्च दाबाखाली करता येते. LiO2 तयार होत नाही.

रासायनिक दृष्ट्या ही मूलद्रव्ये अत्यंत क्रियाशील आहेत व ती हवेमध्ये उघडी राहिल्यास जलदपणे काळवंडतात व त्यांची ऑक्साइडे पृष्ठभागावर तयार होतात. Li पासून Cs कडे मूलद्रव्यांची पाण्याशी होणारी विक्रिया इतक्या जोरदारपणेवाढत जाते की, K पासून पुढे विक्रियेत निघणारा हायड्रोजन आपोआप पेट घेतो.या धातू अमोनियात विरघळतात व निळ्या रंगाचा विद्राव मिळतो. वायुरूपअमोनियाशी पाण्यावरच्या विक्रियेसारखी विक्रिया होऊन हायड्रोजन निघतो वअमाइड तयार होते.

2M + 2NH3 ⟶2MNH2 + H2

अमाइड

(M = गट १ अ मधील कोणतीही धातू).

कोष्टक क्र ३. बोर-टॉम्पसन आवर्त सारणी

ही अमाइडे क्षारकीय असून हायड्रॉक्साइडांशी मिळतीजुळती आहेत. या सर्व धातू हायड्रोजनाशी विक्रिया करतात व त्यापासून हायड्राइडे तयार होतात. ही हायड्राइडे कार्बनी रसायनशास्त्रात क्षपणक [⟶ क्षपण] म्हणून उपयोगी पडतात. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड Li(AIH4) हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

या क्षारीय धातू कार्बनी अम्लातील हायड्रोजनाचे प्रतिष्ठापन करतात उदा., सोडियम ॲसिटेट, पोटॅशियम बेंझोएट इत्यादी. लिथियम मिथिल (LiCH3) व सोडियम एथिल (NA.C2H5) अशासारखी सहसंयुजी संयुगेही तयार करतात. मात्र या धातूंची आयनी त्रिज्याइतर धातूंपेक्षा मोठी असल्यामुळे या धातू सामान्यतः जटिल संयुगे तयार करीतनाहीत तथापि काही अपवादात्मक जटिल संयुगे ज्ञात आहेत.

आ. २. कर्णंसंबंध

कर्णसंबंध: लिथियम हे या गटातील इतर मूलद्रव्यांपेक्षा निराळे आहे. त्याचे साम्य दुसऱ्या गटातील मॅग्नेशियमाशी आहे. कारण Li व Mg यांची ध्रुवण शक्ती [आयन विद्युत भार/(आयन त्रिज्या)2 ] जवळजवळ सारखी आहे. गटातील पहिले सदस्य मूलद्रव्य त्याच्या उजव्या बाजूच्या गटातील दुसऱ्या सदस्य मूलद्रव्याशी गुणधर्माने सारखे असते. याला कर्णंसंबंध असे म्हणतात. तो आ. २ मध्ये दर्शविला आहे. कर्णसंबंधाचा आविष्कार वाढत्या अणुभाराबरोबर कमी होत जातो.

लिथियमाची त्याच्या गटातील इतर मूलद्रव्यांशी असलेली विसंगतता व दुसऱ्या गटातील मॅग्नेशियमाशी असलेले साम्य पुढील स्पष्टीकरणावरून दिसून येईल : (१) वितळबिंदू व उकळबिंदू इतरांपेक्षा उच्च. (२) इतर मूलद्रव्यांपेक्षा Li कठीण आहे. (३) Li ची ऑक्सिजनाबरोबरचीविक्रिया संथ होते व उच्च ऑक्साइडेतयार होत नाही. (४) Li ची विद्युत् घनता इतरांपेक्षा कमी असल्यामुळे त्याची Li2CO3, LiOH3 व LiOH ही संयुगे कमी स्थिर आहेत आणि त्यांचे थोड्याशा तापमानाने अपघटन होऊन (रेणूचे तुकडे होऊन) त्यांचे Li2O या संयुगात रूपांतर होते. त्याचे घन बायकार्बोनेट होत नाही. (५) गट २ मधील मूलद्रव्यांप्रमाणे Li चे नायट्राइड (Li3N) तयार होते. (६) मॅग्नेशियमाप्रमाणे LiCO3, Li3PO4 व LiF ही संयुगे पाण्यात अविद्राव्य किंवा किंचित विद्राव्य अशी आहेत. गट १अ मधील इतर मूलद्रव्यांशी संबंधित संयुगे विद्राव्य आहेत. (७) Li व Mg यामूलद्रव्यांची संयुगे तयार करण्याची प्रवृत्ती असल्याने त्यांची हॅलाइडे वअल्किले कार्बनी विद्रावकात (विरघळणाऱ्या पदार्थात) विद्राव्य आहेत.

गट २ अ : [⟶ बेरिलियम (Be), मॅग्नेशियम (Mg), कॅल्शियम (Ca), स्ट्राँशियम (Sr), बेरियम (Ba) व रेडियम (Ra)]. या गटातील सर्व मूलद्रव्ये धातू आहेत व त्यांच्यात बहुरूपता आढळतनाही. मॅग्नेशियम व कॅल्शियम निसर्गात सर्वत्र आढळतात. स्ट्राँशियम वबेरियम कमी प्रमाणात आढळतात. बेरिलियम अल्प प्रमाणात मिळते. रेडियम हेकिरणोत्सर्गी मूलद्रव्य पिचब्लेंड या खनिजात युरेनियमाच्या किरणोत्सर्गीविघटनाने तयार होते व ते अत्यल्प प्रमाणात मिळते. गट २ अ मध्ये दोनप्रकारची मूलद्रव्ये असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. दुसऱ्या लघू आवर्तातीलबेरिलियम व तिसऱ्या लघू आवर्तातील मॅग्नेशियम यांच्यात बरेच साम्य दिसूनयेते परंतु उरलेल्या चार मूलद्रव्यांशी (Ca, Sr, Ba व Ra) त्यांचे तितकेसेसाम्य दिसत नाही. या चार मूलद्रव्यांच्या समूहाला क्षारीय मृत्तिका असेम्हणतात.रेडियम ही धातू किरणोत्सर्गाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे.

या गटातील मूलद्रव्यांच्या आणवीय संरचनेत बाहेरच्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत. हे दोन संयुजी इलेक्ट्रॉन निघून गेले की, अणूंची जी संरचना शिल्लक राहते (आयन) ती अक्रिय वायूंच्या संरचनेसारखी असते. त्यांच्या भौतिक गुणधर्मांकरिता कोष्टक क्र. १ पहा.

या मूलद्रव्यांच्या अणूंचे आकारमान मोठे आहे परंतु तदनुरूप गट १ अ मधील मूलद्रव्यांच्या अणूंपेक्षा कमी आहे. याचे कारणअसे की, केंद्रावर असलेल्या जादा विद्युत् भारामुळे परिकक्षेतीलइलेक्ट्रॉन आत ओढले जातात. यामुळे या गटातीलमूलद्रव्ये गट १ अ मधीलमूलद्रव्यांपेक्षा जास्त घट्ट आणि कठीण आहेत. यांचे वितळबिंदू उच्च आहेत.ही मूलद्रव्ये द्विसंयुजी असून त्यांची संयुगे आयनी आहेत. यांचे आयनीकरणवर्चस् गट १ अ च्या मूलद्रव्यांपेक्षा जास्त आहे. कारण यांचे अणू लहानअसल्याने इलेक्ट्रॉन घट्ट धरून ठेवले जातात. तसेच एकदा दोन संयुजीइलेक्ट्रॉनांपैकी एक इलेक्ट्रॉन काढून घेतली की, दुसरा इलेक्ट्रॉनकाढण्याकरिता जास्तच ऊर्जा लागते व ती जवळ जवळ दुप्पट असते.


गट १ अ मूलद्रव्यांपेक्षा गट २ अ मूलद्रव्यांची संयुगे भरपूर स्फटिकजलयुक्त असतात उदा., MgCI2 .6H2O, CaCI2 .6H2O, MaCI2.2H2O इत्यादी. यांच्या द्विसंयुजी आयनांची संरचना अक्रिय वायूंच्या संरचनेसारखीअसल्यामुळे त्यांची संयुगे प्रतिचुंबकीय (चुंबकामुळे अपसरण होणारी व आपलीस्थिती चुंबकीय प्रेरणा रेषांना काटकोनात ठेवण्याची प्रवृत्ती असलेली) वरंगहीन असतात. फक्त अम्ल मूलक रंगीत असेल, तरच संयुगे रंगीत असतात. या धातूगट १ अ धातूंपेक्षा कमी धन विद्युती आहेत, तरी देखील त्यांची पाण्याशीविक्रिया होऊन हायड्रोजन व धातवीय हायड्रॉक्साइडे तयार होतात. हीहायड्रॉक्साइडे गट अ च्या हायड्रॉक्साइडांपेक्षा दुर्बल आहेत याचे कारणआयनांवरील जादा विद्युत् भार हे आहे. उदा., Ca2+ व OH- यांमधील आकर्षण जादा विद्युत् भारामुळे जास्त असते आणि स्वतंत्र OH- आयन थोडे उरतात आणि Na+ व OHयांमधील कमी आकर्षणामुळे OH आयन भरपूर असतात.

या गटातील मूलद्रव्यांची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

(१)गटात वरून खाली विद्युत् घनता वाढत जाते.

(२)जालक ऊर्जा कमी होत जाते. आयनांच्या पृष्टभागावरील धन विद्युत् भार बेरिलियमापासून रेडियमाकडे कमी होत जातो. त्यामुळे संयुगांची विद्राव्यता Be ते Ra अशी वाढत जाते. उदा.,

Mg(OH)2 Ca(OH) 2 Sr(OH) 2 व Ba(OH) 2

अविद्राव्य किंचित विद्राव्य विद्राव्य

(३)जालक ऊर्जा व जलसंयोगी ऊर्जा यांच्या प्रमाणावर विद्राव्यता अवलंबून असते. त्यामुळे काही वेळा विद्राव्यता कमीदेखील होत जाते. उदा.,

MgSO4 Ca SO4       Sr SO4 व Ba SO4

विद्राव्य किंचितविद्राव्य         अविद्राव्य

(४)जलसंयोगी ऊर्जा Be ते Ra कमी होत जाते. याचा अर्थ मूलद्रव्यांच्या संयुगांत स्फटिकजल कमी होत जाते. उदा., MgSO4.7H2O, CaSO4.2H2O, BaSO4 (स्फटिकजल नाही). 

क्षारीय मृत्तिका मूलद्रव्यांची पाण्याशी ताबडतोब विक्रिया होते आणि हायड्रोजन व हायड्रॉक्साइडे तयार होतात. मॅग्नेशियम फक्त उकळत्या पाण्याचे अपघटन करू शकते. बेरिलियमाची वाफेशी उच्च तापमानालादेखील विक्रिया होत नाही. या मूलद्रव्यांचे क्षारकीय बल Be पासून Ba पर्यंत वाढत जोते. हे त्यांच्या कार्बोनेटांच्या अपघटन तापमानावरून दिसून येते.

संयुग BeCO3 MgCO3 CaCO3 SrCO3 BaCO3

अपघटन &lt १००     ५४०       ९००    १२९०  १३६०

तापमान (oसे.)

पेरॉक्साइडे तयार होण्याची सहजता वाढत जाते.

O2
Mg MgO
O2
Ca CaO
O2 O2
Sr SrO SrO2
O2 O2
Ba BaO BaO2

गट १ अ मधील मूलद्रव्यांसारखी यांची सुपर ऑक्साइडे तयार होत नाहीत. बेरिलियम व मॅग्नेशियम रेणवीय ऑक्सिजनाशी सरळ संयोग पावतात व त्यांची Beo व MgO अशी ऑक्साइडे तयार होतात. या विक्रियेत प्रकाश व उष्णता निर्माण होतात.

पुढील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा.